साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के सहा पैकी चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के ..

 साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के

सहा पैकी चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के ..



साखरखेर्डा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के एवढा लागला असून, एकूण सहा पैकी चार माध्यमिक विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे.

जिजामाता विद्यालयाचे एकूण १५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. या १५३ पैकी ९२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर अवघे १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

श्री शिवाजी हायस्कूलचे १३६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे.

अनिकेत इंग्लिश स्कुलचे २७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे.

सहकार विद्या मंदिरचे ५१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे.

एस. इ. एस. हायस्कुलचे १२८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन त्यापैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी ९९.२१ आहे.

तर उर्दू हायस्कूलचे ४२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन, त्यापैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी ८०.९५ आहे.


जिजामाता विद्यालय साखरखेर्डा येथील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत

राज प्रविणकुमार शिंगणे ९६.८०%, कु. ज्ञानेश्वरी सतीश सरकटे ९४.२०%, कु. अनुष्का अनिल खंडागळे ९२.६०, निखिल विनोद वायाळ ९२.४०%, कु. नेहा अशोक केंधळे ९२.२०%, कु. वैष्णवी किशोर गप्पे ९१.००%, कु. सानिका रामेश्वर शिंगणे ९१.००%, कु. प्रतिक्षा संजय नवले ९०.२०%, राम विठोबा गावडे ९०.००%, कु. कल्याणी विजय ठोके ८९.२०%, यशराज पांडुरंग शिंगणे ८९.२०%, कु. आशा माणिक केंधळे ८९.००%

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा