समृद्धी महामार्गावर अपघातात डिग्रस, ता. देऊळगावराजा येथील मांटे कुटुंबातील तीन ठार गाव व परिसरात शोककळा

 समृद्धी महामार्गावर अपघातात

डिग्रस, ता. देऊळगावराजा येथील 

मांटे कुटुंबातील तीन ठार

गाव व परिसरात शोककळा





सिंदखेडराजा:- समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापुर जवळ सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस येथील तिघेजण ठार झाल्याची घटना आज दि. ४ जून, रविवारी सकाळी ४.०० वा. सुमारास घडली आहे.

डिग्रस येथील मांटे कुटुंबीय टाटा निस्सान क्र. एम. एच. २८ ए झेड  ७५४६ ह्या वाहनाने वाशिम येथे आयोजित असलेला कुटुंबातीलच लग्नसोहळा आटोपून मालेगावकडून परत येत होते. दरम्यान फर्दापुर नजीकच्या चॅनेल क्र. २८३ जवळ वाहन थांबवून, त्यातील तिघे जण लघवी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडविले.

या अपघातात विजय शेषराव मांटे, वय ४८, तुषार गजानन मांटे, वय ३४ व ओम विजय मांटे, वय २० हे तिघेजण ठार झाले आहेत.

वाहनात एकूण सहाजण असल्याचीही माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

अपघाताची माहिती मिळताच फर्दापुर पोलीस मदत उपकेंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मेहकर येथील सरकारी दवाखान्यात हलविले.

तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघेही मृत झाल्याचे सांगितले.

तिन्हीही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मेहकर येथील सरकारी दवाखान्यात ठेवण्यात आले आहेत.

अपघाताची माहिती मोबाईलद्वारे तसेच समाजमाध्यमातून कळताच डिग्रस गावावर व संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

एकाच कुटुंबातील वडील, मुलगा व पुतण्या ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ह्यातील विजय मांटे हे विमा कंपनीचे काम करीत असल्याची, तुषार हा अभियंता व ठेकेदारी करीत होता तसेच ओम हा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मृतक तुषारची आज एमपीएससीची परीक्षा होती, असेही काही युवकांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

  1. भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. ह्दय हेलावून टाकणारी घटना!! भावपुर्ण श्रध्दांजली!!

    उत्तर द्याहटवा
  3. समृद्धी महामार्ग वर चालताना काळजी घ्यायला पाहिजे खूपच दुखत घटना ईश्वर मानटे कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच दुर्दैवी घटना,ईश्वर मांटे कुटुंबीयास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो,ओम शांती🙏💐

    उत्तर द्याहटवा
  5. भावपूर्ण श्रध्दांजली

    उत्तर द्याहटवा
  6. भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  7. खुपच दुर्दैवी घटना घडली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  8. भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  9. भावपुर्ण श्रध्दांजली

    उत्तर द्याहटवा
  10. खरोखरच काळजाला धक्का बसला तुषार भाऊ तुमच्या जाण्याणे खुपचं दुःख झाले ईश्वर तुषार भाऊ यांच्या कुटुंबातील लोकांना दुःख सावरण्याची शक्ती देऊ जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  11. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  12. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    उत्तर द्याहटवा
  13. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  14. भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  15. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

    उत्तर द्याहटवा
  16. भावपूर्ण श्रद्धांजली😭😭

    उत्तर द्याहटवा
  17. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    उत्तर द्याहटवा
  18. भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  19. समृद्धी महामार्ग मृत्यु चा सापळा ठरला असून त्यावर त्वरित प्रत्येक 50 किमी वर स्वतंत्र पार्किंग व सुलभ शोच्यालय असणे आवश्यक व अति गरज झाली आहे, महामार्ग वर वाहन उभे करणे म्हणजे मृत्यु ला निमंत्रण आहे.
    प्रत्येक एन्ट्री व एक्झिट ला समृद्धी वर आतापर्यंत झालेल्या अपघात व मृत्यु चे विश्लेषण करणारी माहिती पत्रके छापून त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांना देणे गरजेचे आहे,
    1 वाहन उभे केल्याने अपघात
    2 अंधारात रस्ता ओलांडताना अपघात
    3 टायर फुटून अपघात
    4 डुलकी आल्याने अपघात
    5 उभ्या वाहनास धडक देऊन अपघात
    6 अती वेगाने वाहन पेटल्याने अपघात
    7 रोड हिप्नॉटझम ने अपघात
    8 वेळीच फ्रेश होण्याच्या असुविधा असल्याने अपघात
    9 वाहनचालक व वाहनाचा फिटनेस नसल्याने अपघात
    10 रस्ता अगदी सरळ असल्याने चालक मेंदू व शरीर शिथिल झाल्याने आपोआपच झोप लागून अपघात
    या व ईतर सर्व कारणाने झालेल्या अपघातांची माहिती प्रत्येकाला प्रसारित करणे गरजेचे आहे,
    वेगवेगळ्या अपघातात घटना, तारीख, वेळ,ठिकाण, कुटुंब,वाहन,प्रवासी यांच्या लघुकथा माहिती स्वरूपात दिल्यास अपघात नियंत्रित करता येतील.
    मृत्यूमुखी पडलेले पिता पुत्र अनेक वर्ष आम्ही शेजारी असल्याने कुटुंबातील व्यक्तीला हरविल्या सारखे वाटत असुन पिता, पुत्र, पुतण्या सर्व होतकरु तरूण गेल्याचं वेदनादायी दुःख पेलणे अवघड आहे.

    कुटुंबातील व्यक्ती ना हे दुःख पेलण्यास ईश्वर शक्ती देवो.😢😢

    उत्तर द्याहटवा
  20. मी वरील भावना व्यक्त करताना काही चूक झाली असेल तर माफ करावे. (संतोष सानप 9422555452 देऊळगाव मही)

    उत्तर द्याहटवा
  21. भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  22. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    उत्तर द्याहटवा
  23. मित्रा तुझी खूप आठवण येते आहे

    उत्तर द्याहटवा
  24. भावपुर्ण श्रध्दांजली💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा