साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९८.३३ टक्के सहा पैकी दोन विद्यालयांचा निकाल शंभर टक्के ..

 


साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९८.३३ टक्के

सहा पैकी दोन विद्यालयांचा निकाल शंभर टक्के ..

साखरखेर्डा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९८.३३ टक्के एवढा लागला असून, एकूण सहा पैकी दोन माध्यमिक विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे.

जिजामाता विद्यालयाचे एकूण १२८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२७ उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी ९९.२१ आहे. या १२७ पैकी ६४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर अवघे २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

श्री. शिवाजी हायस्कूलचे १६८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन त्यातील १६७ झाल्याने टक्केवारी ९९.४० आहे.

अनिकेत इंग्लिश स्कुलचे ३५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे.

सहकार विद्या मंदिरचे ५४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे.

एस. इ. एस. हायस्कुलचे ११९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन त्यापैकी ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी ९८.३१ आहे.

तर उर्दू हायस्कूलचे ५८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन, त्यापैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी ९३.१० आहे.



जिजामाता विद्यालय साखरखेर्डा येथील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. 

प्रथम क्रमांक - कु. तृप्ती रमेश बेंदाडे ९६.६०% व गणितात १०० पैकी १०० गुण 

द्वितीय - आशिष रवींद्र झनके ९६.२०%

तृतीय - ऋषिकेश गजानन उबाळे ९५.२० व गणितात १०० पैकी १०० गुण

चतुर्थ - महेंद्र गजानन खंडारे ९२.६९%

 पाचवा - तुषार रमेश कव्हळे ९२.२०%

सहावा - कु. सलोनी महावीर जैन ९२%

          - कार्तिक शिवशंकर मेरत ९२%

सातवा - तुषार विकी गवई ९१.६०%

आठवा - ओम राजू जायभाये ९१.४०%

नववा - वैष्णवी दत्तात्रय खरात ९१%

दहावा - यश मनोहर रिंढे ९१%

अकरावा - तुषार विष्णू ठोसरे ९०.६०%

             - ज्ञानेश्वर भागवत कदम ९०.६०%


दहावीच्या निकालात जिजामाता पॅटर्नची घोडदौड कायम


येथील जिजामाता विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे आपली गुणवत्तेची परंपरा कायम ठेवल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

विद्यालयातून एकूण १३० विद्यार्थ्यांनी परीक्षा नोंदणी केली होती. त्यातील १२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९९.२१ आहे.

यातील ६४ विद्यार्थी प्राविण्य व ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत असे एकूण १०५ विद्यार्थी गुणवत्तेत उत्तीर्ण झाले आहेत.

ग्रामीण भागातील ह्या विद्यालयात शैक्षणिक बाबीसह क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक असे अनेक उपक्रम राबविले जातात. येथे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनिअरिंग क्षेत्रात नव्हेतर बहुतांश विद्यार्थी शासकीय नोकरीत आहेत. दरवर्षी किमान एकतरी विद्यार्थी एमबीबीएस म्हणजे मेडिकलला जातोच, असा शाळेचा इतिहास आहे.

मुख्याध्यापक रमेश ठोसरे, रमेश दंदाले, वसंत पाटील, शिवशंकर मखमले, सुहास भावसार, देविदास खिल्लारे, दीपक नागरे, कुंवरसिंग चव्हाण, संदीप निलख, राजू पडघान, महेश सावजी, बाबुराव साबळे, अशोक गवई, पुरुषोत्तम मानतकर आदि शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा