निकाल दहावीचा:- सिंदखेडराजा, जिल्हा व तालुक्यांच्या निकालाची आकडेवारी



निकाल दहावीचा 

९५.७९ टक्के घेऊन सिंदखेडराजा जिल्ह्यात तिसरा

जिल्हा व तालुक्यांच्या निकालाची आकडेवारी

सिंदखेडराजा:- आज दि. २ जून, शुक्रवारी जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तालुक्यातील त्रेचाळीस माध्यमिक विद्यालयांचा सरासरी निकाल एकूण ९५.७९ टक्के एवढा लागला आहे.

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण २ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २ हजार ७५७ विद्यार्थ्यी परीक्षेला सामोरे गेले. यापैकी २ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार १४१ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, १ हजार १०० प्रथम श्रेणीत, ३५९ द्वितीय श्रेणीत तर ४१ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

तालुक्यातील एकूण ४३ विद्यालयांपैकी ५ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये स्वामी विवेकानंद सोनोशीचे ६७ विद्यार्थी, कै. भास्करराव शिंगणे दरेगावचे २६, सहकार सिंदखेडराजाचे ७०, अनिकेत साखरखेर्डाचे ३५ व सहकार साखरखेर्डाचे ५४ असे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


तालुक्यातील दहावीच्या निकालात नूतन, किनगावराजाची टक्केवारी ९५.२९, एस. इ. एस. साखरखेर्डाची टक्केवारी ९८.३१, जिजामाता सिंदखेडराजाची ९६.७३, नेहरु मलकापूर पांग्राची ९९.२७, श्री. शिवाजी साखरखेर्डाची ९९.४०, शिवाजी जांभोराची ९७.१४, जनता सावखेड तेजनची ९८.९३, वसंतराव नाईक शेंदूरजनची ९५.८३,  यशवंतराव डिग्रसची ८९.२८, स्वामी विवेकानंद सोनोशी १००, म. जोतिबा फुले सिंदखेडराजाची ८४.५२, जीवन विकास दुसरबीडची ९७.१२, संजय गांधी धांदरवाडीची ९६.२५, जिजामाता साखरखेर्डाची ९९.२१, जीवन विकास साठेगावची ८९.२८, जिजामाता आडगावराजाची ९२.३०, राष्ट्रमाता जिजाऊ कन्या सिंदखेडराजाची ९८.०३, सावित्रीबाई फुले कन्या सिंदखेडराजाची ८९.६५, तुकाराम कायंदे रुम्हणाची ९६.३९, श्री. ज्ञानेश्वर दुसरबीडची ९५.८९, यशवंतराव चव्हाण राजेगावची ९३.५४, अण्णासाहेब गायकवाड देऊळगाव कोळची ९६.४२, उर्दू साखरखेर्डाची ९३.१०, कामक्षादेवी किनगावराजाची ९२.०६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्दू सिंदखेडराजाची ९२.३०, नेताजी सुभाषचंद्र बोस शेंदूरजनची ९६.००, प्रो. जावेदखान उर्दू दुसरबीडची ९४.११, कै. भास्करराव शिंगणे दरेगावची १००, सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे चांगेफळची ९६.००, स्व. विजय मखमले हिवरखेडची ९७.६१,  काकासाहेब शिंगणे अंचलीची ८३.८७, भास्करराव शिंगणे, गुंजची ९०.००, संत दुनियादास महाराज राहेरीची ६८.४२, सावित्रीबाई फुले शिवणी टाकाची ८१.४८, वैभव वर्दडीची ८९.०९, विजय मखमले मलकापूर पांग्राची ९४.५९, भास्करराव शिंगणे खैरवची ९६.६६, विजय मखमले उर्दू, मलकापूर पांग्राची ९५.६५, सहकार सिंदखेडराजाची १००,  आदर्श सिंदखेडराजाची ९७.९७, सहकार साखरखेर्डाची १००, अनिकेत साखरखेर्डाची १००, छत्रपती शाहू चिंचोलीची ९२.८५ अशी टक्केवारी आली आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्यार्थिनींनी गुणवत्तेत आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

 मोजक्या शाळांनी आपल्या शाळेत निकालाची व्यवस्था केली होती. तर अनेक शाळांमध्ये आज महत्वाचा  दिवस असूनही चिटपाखरु आढळले नाही.


बुलडाणा जिल्ह्यातून एकूण ३९ हजार २९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंद केली होती. त्यापैकी ३८ हजार ९८३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यातील ३५ हजार ६०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याची टक्केवारी ९३.९० एवढी आहे.


जिल्ह्यातील तालुक्यांची गुणवत्ता निहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


१) देऊळगावराजा ९७.०३

२) चिखली ९६.०१

३) सिंदखेडराजा ९५.७९

४) मोताळा ९५.४३

५) बुलढाणा ९४.७१

६) लोणार ९४.३८

७) मेहकर ९४.२७

८) मलकापूर ९३.१२

९) खामगाव ९२.२७

१०) शेगाव ९१.७६

११) संग्रामपूर ९१.४७

१२) नांदुरा ९१.२४

१३) जळगाव जामोद ९१.१६

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!