आषाढ महिना? नेमके काय??
आषाढ महिना? नेमके काय??
आषाढ महिना वारकरी संप्रदायातील प्रत्येकासाठी महत्वाचा व पवित्र समजला जातो.
आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे. यंदा आषाढ महिना सोमवार, १९ जून २०२३ ला सुरु होणार असून तो सोमवार, १७ जुलै रोजी संपत आहे.
पंचांगानुसार, चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षाचा चौथा महिना म्हणजेच आषाढ महिना होय. हा इंग्लिश कॅलेंडरच्या जून किंवा जुलै महिन्यात येतो. या वेळी भारतात भरपूर पाऊस पडत असल्याने हा पावसाळ्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. खूप उष्णता सहन केल्यानंतर या महिन्यात आपल्याला थोडास दिलासा मिळतो.
या महिन्यापासून पावसाळा सुरू होतो. हवामानातील बदलामुळे या महिन्यात आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
या हंगामात संसर्गाचा धोका लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत या काळात पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या. (Sanskruti)आषाढ महिन्यात खाण्यापिण्याच्या या गोष्टींची काळजी घ्या- या महिन्यात पाणी असलेली फळे खा.- कमीत कमी तेलाच्या वस्तूंचे सेवन करा.- शिळे अन्न खाऊ नका.
आजपासून प्रारंभ होणाऱ्या आषाढ महिन्यात आपल्याला आयुरारोग्य, मनःशांती, समाधान लाभो ..!
ह्याच सदिच्छा ....!!


👌
उत्तर द्याहटवा