वाढदिवस असा असावा ..!




 आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान

रक्तदानातून वाढदिवस साजरा करणारे 

डॉक्टर रामदास शिंदे साहेब. 

मनःपूर्वक शुभेच्छा ....!🌷🎂🙏

देऊळगावराजा:- युवावस्थेत येत असतांनाच स्व. सुरेशभाऊ सोनुने ह्यांच्या वैचारिक दिशेने देऊळगावराजा व परिसरातील आम्हा युवकांची चळवळ उभी राहिली.

त्यानंतर एमबीबीएस झालेला व आपल्या तालुक्याला लागून असलेल्या ताडशिवणी येथील एक रामदास नावाचा कुणीतरी डॉक्टर शहरात आलाय, इतकी माहिती मिळाली. 

सर्व बाजूंनी सर्व्हेक्षण करणारी आमची टोळी होती.

सिनेमात काय झालंय? रस्त्यावर काय घडतंय? चौकाचौकात काय होतंय? सगळ्या दिशेनं आम्ही कार्यरत होतो. सर्व्हेक्षण झाल्यावर आमची स्थानिक चौंडेश्वरी हॉटेलवर आम्हा सर्वांची मिटिंग व्हायची. त्यानंतर कुणाला साथ द्यायची, कुणासाठी ओळख न दाखवता निरपेक्ष राहायचे, ह्यासंदर्भात लीडर म्हणजे आम्हा सर्वांचे लाडके स्व. सुरेशभाऊ सोनुने हे आदेश द्यायचे. त्यानुसार आम्ही सकाळी कार्यरत व्हायचो. दुपारी पुन्हा दुसरे सर्व्हेक्षण हा नित्याचा कार्यक्रम असे. 

एका दिवशी सकाळीच आपल्या गावात डॉ. रामदास शिंदे नावाची व्यक्ती आली, असा मेसेज मिळाला. त्यावेळच्या गावातील खुंट चौकात, गुप्ता सरांच्या जागेत दवाखाना सुरु असल्याची खात्री पटली. आम्हा सर्व कार्यकर्त्यांची सायंकाळी मिटिंग झाली. त्यामध्ये पैसे न विचारता हा डॉक्टर रोग निदान व उपचार असे काम करीत असल्याचे निदर्शनास आले. 

त्यादिवसापासून तर आजपर्यंत आम्ही सगळे ह्या डॉ. रामदास शिंदे ह्यांचे फॅन आहोत.

नव्हेतर त्या व्यक्तीच्या सामाजिक जाणीवेचे उतराई आहोत.

त्या डॉ. रामदास शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! 

सोबतच फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे वारस असलेले आम्ही आपणासोबतच आहोत.

जय महाराष्ट्र ..!

जयहिंद ....!! 🇮🇳

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल