धन्यवाद ..! डॉ. विशाल शितोळे.
धन्यवाद ..!
डॉ. विशाल शितोळे.
श्री. माणिकराव घुगे, वय ८८ वर्षे, सेवानिवृत्त अभियंता, चिखली, जि. बुलढाणा यांचा दि. ८ जानेवारी, रविवारी घरगुती अपघात होऊन, पाय फ्रॅक्चर झाला होता. अगोदर बायपास सर्जरी झालेली, उतरतं वय, अन त्यात पाय फ्रॅक्चर फेमेर हाड मोडलेले, आता यावर उपचार करण्यासाठी नेमके कोणत्या दवाखान्यात न्यावे? असा प्रश्न कुटुंबीय व नातेवाईकांना पडला. त्याचवेळी चिखली येथीलच शिवाजी उद्यानाकडून बुलढाणा मार्गावर असलेल्या
शितोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल मधुकर शितोळे यांनी जबाबदारी घेण्याचे कबूल केले.
दि. १० जानेवारी, मंगळवारी शस्त्रक्रिया करीत रॉड टाकण्यात आले.
आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी आज दि. ११ जानेवारी, बुधवारी घुगे साहेबांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामही केला. दवाखान्यातून उद्या सुटी देखील होणार आहे.
अगोदरच बायपास सर्जरी झालेल्या आणि त्यात उतरत्या वयाच्या रुग्णाला तीन ते चार दिवसांत आराम मिळतो.
हे सगळं अनुभवल्यावर कुटुंबीय व नातेवाईक यांनी रुग्णाला जर मोठ्या शहरात नेले असते तर विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या (मेडिकल टेस्ट्स) करण्यातच वेळ गेला असता आणि रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्याला आणखी खूप दिवस लागले असते, असे विचार व्यक्त केले.
त्यामुळेच डॉ. विशाल शितोळे हे अभिनंदनास पात्र ठरतात.
तर घुगे कुटुंबीय व नातेवाईक त्यांचे मनःपूर्वक आभार मानत आहेत.


छान..
उत्तर द्याहटवाडॉक्टरांच्या संवेदनशील आणि मानवतावादी दृष्टिकोणास सलाम!👏👏👏
उत्तर द्याहटवा