सातासमुद्रापार .. आपल्या "राजूचा" झाला सत्कार ..

 सातासमुद्रापार ..

पल्या "राजूचा"

झाला सत्कार ..





मागील ७५ वर्षात ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा नुकताच ब्रिटनमध्ये सत्कार करण्यात आला. आपल्यासाठी या पुरस्कारामध्ये महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ह्या अगदी छोट्या गावातील शेतकरी पुत्र राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांस लंडनच्या ब्रिटिश कॉन्सिलतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. 

ब्रिटिश कौन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नुकताच पार पडला. राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोट्याश्या खेड्यातील भटक्या असलेल्या वंजारी समाजातून येतात. राजू हा त्याच्या पिढीतील उच्च शिक्षण घेणारा व्यक्ती  आहे. राजूचे शालेय शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो पुण्यात गेला परंतु, आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे राजूला पुणे सोडावे लागले. या अनुभवातूनच उच्च शिक्षण घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, मदत व्हावी ह्या हेतूने त्याने एकलव्य फाउंडेशन सुरू केले.
पुणे सोडल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून "ग्रामीण विकास" विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०२१ मध्ये त्यांना जगातील प्रतिष्ठित समजली जाणारी, ब्रिटीश सरकारची मानाची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली. त्या माध्यमातून एसओएस, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून एमएससी एन डेव्हलपमेंट स्टडीजचे शिक्षण् पूर्ण केले. लंडन येथील शिक्षणादरम्यान त्याने "उच्च शिक्षण आणि असमानता" या विषयावर संशोधन केले आहे. त्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीडीश इन्स्टिट्यूट व जर्मन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट येथील फेलो म्हणून पण निवडले होते. इतकेच नव्हे तर मागच्या वर्षी प्रतिष्ठीत अशा फोर्ब्स मासिकाने सुद्धा त्याला ३० प्रतिष्ठीत युवकाच्या यादीत समावेश केला होता.
प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या राजुच्या सत्काराने उर भरुन येत आहे.
विनम्र परंतु स्वाभिमानी स्वभावाच्या राजुसोबत आपण सर्व आहोतच.
फुले, शाहू व आंबेडकरी विचारांची शिदोरी सोबत असली की, काय होऊ शकते? हे स्फुल्लिंग माझ्यासारख्या भटक्यांना तुझ्यातून मिळतेच मिळते._
तुझ्या मनातील इच्छा व आकांक्षाची अशीच प्रगती होत राहो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा