भावी वैज्ञानिकांना बळ देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत - डॉ. बाळासाहेब गावंडे


विद्यार्थ्यांतील भावी वैज्ञानिकांना बळ देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत - डॉ. बाळासाहेब गावंडे

सिंदखेडराजा:- "विद्यार्थ्यांच्या आतल्या उर्जेतून आलेल्या वैज्ञानिक संकल्पना व त्यातून निर्माण होणाऱ्या भावी वैज्ञानिकाला बळ देण्याचे काम शिक्षकच करु शकतात" असे प्रतिपादन डॉ. निलेश उपाख्य बाळासाहेब गावंडे यांनी केले.

आज दि. ६ जानेवारी, शुक्रवारला साखरखेर्डा येथे आयोजित सिंदखेडराजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणुन ते मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुमनताई सुनील जगताप तर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे, विज्ञान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक नागरे, केंद्रप्रमुख गणेश डिघोळे, दिलिप खंडारे, माधव देशमुख, नंदकिशोर शिंगणे, संतोष सोनुने, विलास कायंदे, दिलीप काकडे, विलास आघाव आदि  प्रमुख उपस्थितीत होते. पुढे बोलतांना गावंडे ह्यांनी महाविद्यालयात होणाऱ्या अंतर्गत उपक्रमांचे विश्लेषण केले.

तर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे ह्यांनी एका बैठकीसाठी आलो असता, अचानक एक सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलो असतांना आपल्याला महाविद्यालयात असलेल्या विविध अभ्यासक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यातून आपण भारावले गेलो, असे म्हणत तालुक्यात पहिल्याच वेळी भव्यदिव्य असे विज्ञान प्रदर्शन आयोजित केल्या गेल्याचे समाधान व्यक्त केले.

तर केंद्रप्रमुख दिलीप खंडारे ह्यांनी प्राचार्य डॉ. निलेश उपाख्य बाळासाहेब गावंडे हे आपण प्रत्यक्ष शिक्षणाचे भगीरथ म्हणून अनुभवले असल्याचे बोल उद्धृत केले.

सरपंच सौ सुमनबाई जगताप ह्यांनी तालुक्यातून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचे स्वागत करीत, ह्या महाविद्यालयाच्या रुपाने गावाच्या विकासात भर पडल्याचे विचार कथन केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. सागर गवई ह्यांनी तर विज्ञान शिक्षक संघटनेचे तालुका दीपक नागरे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

वैज्ञानिक उपकरणांची मांडणी झाल्यावर दिवसभरात स्थानिक तसेच परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन, विद्यार्थी तसेच शिक्षक व प्रयोगशाळा कर्मचारी ह्यांच्या उपकरणांतील वैज्ञानिक भूमिका जाणून घेतली.

दरम्यानच्या काळात उपकरणांचे मूल्यमापन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा