डॉ. विशाल इंगोले हे संवेदनशील तसेच धारिष्ट्यवान विचारांचे कवी होते - साहित्यिक बाबाराव मुसळे



डॉ. विशाल इंगोले हे संवेदनशील तसेच धारिष्ट्यवान विचारांचे कवी होते - साहित्यिक बाबाराव मुसळे


सिंदखेडराजा:- स्व. डॉ. विशाल इंगोले यांच्या कविता वाचली म्हणजे विद्रोहाच्या स्फोटातून क्रांती पेटवणारी मशाल ठरावी, एवढी धारिष्ट्याची ती कविता होती असे वक्तव्य प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, जेष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे, वाशिम यांनी केले.
तालुक्यातील दुसरबीडच्या नगरमाळ येथील सावित्रीबाई मंगल कार्यालयात आज दि. ५ एप्रिल, रविवारी आयोजित स्मृतीशेष कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिकाजी तळेकर, खैरव हे तर प्रसिद्ध चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार, पेण व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख हे प्रमुख उपस्थित होते. 
कार्यक्रमात सर्वप्रथम प्रसिद्ध युवा कवी तान्हाजी बोऱ्हाडे, मु. कानसे, पो. शिनोली, ता. आंबेगाव, जि. पुणे यांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना बाबाराव मुसळे यांनी कवितेच्या निर्मिती व प्रकाशनाची प्रक्रिया कथन केली. आपल्या ह्या अभ्यासातून तान्हाजी बोऱ्हाडे यांच्यातील कवी सुद्धा ग्रामीण, शेतकरी जीवनाचा साध्या सोप्या भाषेत संवेदनशील विचार मांडतो, असेही स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देतांना प्रसिद्ध युवा कवी तान्हाजी बोऱ्हाडे यांनी आपल्या शेतकरी बापाने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते व त्यामुळे त्यांनी आपल्या हातात पाटी व पुस्तक देऊन शाळेत पाठविले. शिक्षणादरम्यान आपल्या सभोवतालच्या परिस्थितीतून आपल्यातील कवी घडला अशी कविता निर्मितीची भावनिक कथा व व्यथा व्यक्त केली.
तर कवी श्रीकांत देशमुख यांनी बोलतांना कविता व गीत यातील फरक सविस्तरपणे स्पष्ट करीत, मराठी साहित्य क्षेत्रात केवळ अन केवळ स्व. ना. धों. महानोर हेच एकमेव व्यक्तिमत्त्व कवी व गीतकार ह्या दोन्हीही व्याख्येत चपखल बसत असल्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
मराठी चित्रपटसृष्टीतील गीतकार डॉ. विनायक पवार यांनी चित्रपट सृष्टीतील गीते ही अगदीच साध्या सोप्या भाषेत का असावी? ह्याची फोड करीत कविता आणि गीत यावर श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या विश्लेषणावर मार्मिकपणे टिप्पणी केली. तसेच स्वतःच्या गीतांचे सुश्राव्य गायन केले. याचवेळी राज्य, देश व विदेशातील सध्याच्या परिस्थितीवर सोदाहरण हास्यात्मक मीमांसा करीत, सद्यपरिस्थिती किती प्रचंड गंभीर आहे, हे मांडत, श्रोत्यांना अंतर्मुख केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी रविंद्र साळवे यांनी, प्रास्ताविक कवी मधुकर जाधव तर प्रवीण गीते व विठ्ठल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. व्याख्याते प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाला इंगोले कुटुंबीय, डॉ. विशाल इंगोले यांचे जिल्हाभरातील मित्रमंडळी, लोकजागर परिवारातील मंडळी यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


स्व. कवी डॉ. विशाल इंगोले हे उत्कृष्ट चित्रकार सुध्दा असल्याने,  बाबाराव मुसळे यांनी वयाच्या पंचाहत्तरीत लिहिलेल्या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठासाठी विशाल इंगोले यांनी आजारी असतांनाही उत्तम प्रकारचे चित्र रेखाटले होते, असेही मुसळे यांनी सांगितले. त्यावेळी वातावरण गंभीर होऊन, श्रोत्यांचे कंठ दाटून आले होते.

प्रसिद्ध युवा कवी तान्हाजी बोऱ्हाडे, मु. कानसे, पो. शिनोली, ता. आंबेगाव, जि. पुणे यांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन गौरवितांना मान्यवर 

साहित्यिक बाबाराव मुसळे हे कवी विशाल इंगोले यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ असलेला कवितासंग्रह त्यांच्या पत्नी श्रीमती सोनाली इंगोले यांना भेट देतांना
साहित्यिक बाबाराव मुसळे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना 
मराठी चित्रपटसृष्टीतील गीतकार डॉ. विनायक पवार मनोगत व्यक्त करतांना 
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख मनोगत व्यक्त करतांना 
प्रसिद्ध युवा कवी तान्हाजी बोऱ्हाडे, मु. कानसे, पो. शिनोली, ता. आंबेगाव, जि. पुणे  हे सत्काराला उत्तर देतांना 
मनोगत व्यक्त करतांना लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते 
मनोगत व्यक्त करतांना सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण 

प्रास्ताविक करतांना कवी मधुकर जाधव 
तुळशी वृंदावनाला जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना मान्यवर
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करतांना रविंद्र साळवे 
आभार प्रदर्शन करतांना व्याख्याते प्रा. सिद्धेश्वर आंधळे 

स्मृतीशेष कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांची मांदियाळी




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा