पोलीस पाटलांनी गावांतील शांततेला प्राधान्य द्यावे - गणेश डोईफोडे :: कार्यकारिणी अध्यक्षपदी दिगंबर पाटील तर सचिवपदी तुषार चव्हाण

 पोलीस पाटलांनी गावांतील शांततेला प्राधान्य द्यावे - गणेश डोईफोडे 

(अध्यक्ष व सचिवांचा सत्कार करताना दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे)

कार्यकारिणी अध्यक्षपदी दिगंबर पाटील तर सचिवपदी तुषार चव्हाण 



सिंदखेडराजा:- पोलीस पाटलांनी गावांतील घडामोडींचा अगदी बारकाईने अभ्यास करीत त्यातील शांतता व सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या घटनांबाबत पोलिसांना सचेत करीत राहावे, असे आवाहन दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे यांनी केले आहे.

दि. २ मार्च, गुरुवारी पोलीस स्टेशन साखरखेर्डा अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांच्या बैठकीत डोईफोडे हे बोलत होते. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार गजानन करेवाड तर गणेश डोईफोडे हे प्रमुख उपस्थित होते. 

या बैठकीत पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांच्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.

त्यामध्ये डिगांबर पुंडलिक अंभोरे, गजरखेड ‌यांची अध्यक्षपदी तर तुषार उत्तमराव चव्हाण, हनवतखेड यांची सचिवपदी, राजू आत्माराम खरात, रान‌अंत्री यांची उपाध्यक्षपदी तर कोषाध्यक्ष म्हणून प्रताप रतिराम लंबे यांची निवड करण्यात आली आहे. 

यावेळी कार्यकारिणी पदाधिकारी निवडण्यासाठी सूचक म्हणून अनिल भगवान गारोळे, वरोडी तर अनुमोदक म्हणून विजय मनोहर रिंढे, वरदडा यांनी प्रमुख योगदान दिले.

कार्यकारिणीत सदस्य म्हणून शरद शेषराव शेजुळ, राजेगाव, अमोल आत्माराम अवचार, वडगावमाळी, श्रीमती वैशाली मदनराव हाडे, शिंदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 

या बैठकीला पांडुरंग गणपतराव सोनुने, मलकापूर पांग्रा, रामेश्वर त्र्यंबक कायंदे, रामनगर (जनुना), जगदीश आत्माराम तुपकर, गुंज, मंदा राहुल जाधव, राताळी, कावेरी रमेश इंगळे, पेनटाकळी, रवि प्रकाश घोंगडे, विवेकानंदनगर, रमा वसंत सरकटे, शिवाजीनगर, बद्रीनारायण अच्युतराव वडतकर, पोखरी, शरद सोनाजी इंगळे, लव्हाळा आदि पोलीस पाटील उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुषार चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रताप लंबे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला