कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..! ५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण

कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..!

५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण



मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध दिवंगत कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार यावर्षी तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी दिली. 

तान्हाजी बोऱ्हाडे हे इतिहास विषयात उच्चविद्याविभूषित असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील मोहे या गावी शासकीय आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच दुर्गम भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी बाबत ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. विष्णू जोशी यांच्या काव्याग्रह प्रकाशन, वाशिम द्वारा प्रकाशित जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहाचा सुलगती हे धरा पैरोतले हा हिंदी अनुवाद देखील प्रसिद्ध आहे.

ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते, चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीमध्ये व भिकाजी तळेकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 

प्रा. रवींद्र साळवे, प्रा.मधुकर जाधव, विठ्ठल चव्हाण वीरपांग्रा या निवड समितीने प्रस्तुत कवितासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली असून दिनांक ०५ एप्रिल रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्मृतीशेष कवी डॉ. विशाल इंगोले मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा