खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी

 खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव

नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी



सिंदखेडराजा (प्रतिनिधी)  तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नऊ पैकी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांविरोधात उघड बंड पुकारण्यात आले आहे. सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अविश्वास प्रस्ताव थेट तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे.
या बंडामागे केवळ नाराजी नसून, ग्रामपंचायतीतील सत्ताबदलाचे स्पष्ट संकेत दिसत असल्याची चर्चा गावपातळीवर रंगली आहे. जवळपास सर्वच सदस्यांनी एकत्र येत सरपंचांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये “ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता नाही, सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, विकासकामे ठप्प झाली आहेत,” असे गंभीर आरोप केले आहेत.
या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या सदस्यांमध्ये विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरुड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, म्हस्के मीनाक्षी विनोद आणि भालेराव सुनिता सुरेश यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांनी एकत्र येत सरपंचांविरोधात उघडपणे मोर्चेबांधणी केल्याने ग्रामपंचायतीतील राजकारण तापले आहे.
याशिवाय, सरपंच पतीकडून कारभारात होत असलेला कथित हस्तक्षेप, सदस्यांशी समन्वयाचा अभाव, विकासकामांमधील अनियमितता आणि प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव या मुद्द्यांवरही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३५ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार विशेष सभा बोलावून मतदानाद्वारे अंतिम निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जवळपास सर्वच सदस्यांनी ताकद दाखविल्याने सरपंचांच्या गोटात खळबळ उडाली आहे. येणाऱ्या विशेष सभेत नेमके कोण बाजी मारते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत सत्तांतराचे वारे वेगाने वाहू लागल्याची चर्चा रंगली आहे.

तहसीलदार यांना निवेदन देतांना ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा