आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷 माझा साळुबा मामा ..!🙏
आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷
माझा साळुबा मामा ..!🙏
सावखेड तेजन, ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व आम्हा सर्व भाच्यांचे लाडके मामा श्री. साळुबा नामदेवराव जायभाये यांचे चारवर्षांपूर्वी वृद्धापकाळाने आजच्या रोजी म्हणजे दि. २४ जानेवारी, २०२० शुक्रवारी सकाळी ५.३० वा. जालना हॉस्पिटल, जालना येथे निधन झाले.
मृत्युसमयी ते वय ८५ वर्ष्यांचे होते.
किनगावराजा येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शिवानंद जायभाये ह्यांचे वडील असलेले साळुबा मामा हे प्रेमळ ह्या व्याख्येच्या पलीकडे जाणारे व्यक्तिमत्त्व.
त्यांची आठवण झाली की, वेगळीच ऊर्जा आम्हा भाच्यांच्या मनात निर्माण होते.
आम्हा सगळ्या भाच्यांची खूप काही काळजी त्यांनी घेतली.
माय ह्या शब्दात एकदाच 'मा' येतो.
पण
दोनदा मा येणारे जायभाये वाड्यातील आमचे बाजीराव मामा, किसन मामा, राम मामा, उत्तम मामा, कारभारी मामा, आश्रूबा मामा, लक्ष्मण मामा, भीमराव मामा आदि प्रत्येक मामा आमच्या नशिबी होते. नव्हेतर त्यांनी आमच्या व्यक्तिमत्वाला वळण लावले.
म्हणूनच आम्ही घडलो.
आमच्या साळुबा मामांच्या प्रेमळ स्मृती आजही उरात जिवंत आहे.
इथे एक प्रसंग सांगावासा वाटतो. मामा वारल्यानंतर काही दिवसांनी मी व पत्नी विद्या आम्ही दोघे एका कार्यक्रमासाठी व त्यानंतर शिवानंदला भेटण्याच्या निमित्ताने बाबू मामाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे आमच्या साळुबा मामांची पत्नी आमची मामी श्रीमती कासाबाई होती. ती म्हटली दीपक जेवून घे, परंतु त्यापूर्वी मी व पत्नी आम्ही दोघांनी कुठे जेवायचे हे ठरलेले होते. कासामामीचे ते शब्द ऐकून भावनाविवश झालो. सद्गदित होत, लगेच खाली बसलो अन म्हणालो 'बरं मामी'. डोळ्यातील अश्रू न दाखवता, जेवलो.
खरंच हे सुख आमच्या पुढच्या पिढ्यांच्या नशिबात येवो.
लिहितांना कंठ भरुन आलेला व डोळ्यात टचकन आसू आलेत.
नामदेव आज्यांची परंपरा चालविणाऱ्या साळुबा तसेच बाबू मामांची प्रेरणा आजही केवळ उर नव्हेतर नखशिखांत भरुन आहे.
त्यातील आमच्या साळुबा मामांच्या प्रेमळ स्मृतींना विनम्र अभिवादन ..!

टिप्पण्या
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
GAB....
पूर्वीची वाडे आणि त्यातीलमाणसे ही गावगाड्यातील संस्कारकेंद्र होती.जी आजच्या पिढीच्या नशिबी नाही.
जायभाये वाडा आणि त्यातील चौकातील इंग्रजकालीन हापसी मला आजही आठवते.
॥ मामांना विनम्र अभिवादन.॥