बातमी मागची बातमी .. बहारदार सूत्रसंचलनाचा श्रीगणेशा होतोय ..
बातमी मागची बातमी ..
बहारदार सूत्रसंचलनाचा श्रीगणेशा होतोय ..
सिंदखेडराजा:- एखादा कार्यक्रम आयोजित केल्यावर त्या कार्यक्रमाचा निवेदक योग्य आहे, असं म्हटलं की सत्तर टक्क्यांच्या वर कार्यक्रम यशस्वी होतो.
राहेरी येथील नामांतर लॉंग मार्च ह्या कार्यक्रमाच्या आठवणीतून हाच अनुभव आपला लहान भाऊ गणेश ह्याने दिला.
रसिक मनाचा मी एक व्यक्ती, कार्यक्रमात सहभागी जरी झालो नाही तरी त्याचा आढावा घेणे, ही प्रवृत्ती.
त्यातच कुठलाही धारण केलेला मीडिया सोडल्यावर अधिक उत्सुकता तानवुन काय आणि कसं झालं? हे विचारणं नैसर्गिकच.
दरवर्षी प्रमाणे काल म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी राहेरीच्या पुलावर म्हणजे आमच्या गावाच्या शिवावर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ ह्याचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावे, ह्या मागणीसाठी जोगेंद्रजी कवाडे सर ह्यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च करण्यात आला होता.
तत्कालीन शासन व्यवस्थेने राहेरी पुलावर मोर्चा अडविला व मारहाण करुन आंदोलकांच्या नावावर केसेस केल्या होत्या. जानेवारी महिना त्यात सुट्या संपलेल्या असतात. घ्यायची म्हटल्यावर मिळत नाही. त्यामुळे इच्छा असूनही थोडं अडचणीचं होतं. परंतु, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, भगवान बाबा आदि पुरोगामी विचारांची गाथा ज्याच्या हृदयात वसलेली आहे, तो मी म्हणजे दीपक नागरे. त्याने कार्यक्रमाचा आढावा घेतला.
तर नवीनच कळलं की, कुणीतरी गणेश धुंदाळे नावाच्या व्यक्तीने कार्यक्रमच सोपा करुन टाकला.
ह्या कार्यक्रमासाठी माझा चिखलीतील लहान भाऊ विजू गवई, ज्याने माझी अक्षरशः काळजी घेतलेली आहे, तो स्वतः व जोगेंद्रजी कवाडे सर ह्यांची पूर्वपीठिका ज्ञात आहेच.
मग डोक्यात विचार आला की, कुणीतरी सो कॉल्ड सुत्रसंचलन करणारा पूर्वी यायचा मात्र त्याचा आर्थिक, राजकीय व स्वतःचा तोरा वाढलेला असतो म्हणे.
ही पार्श्वभूमी आहे.
मात्र त्याचवेळी गणेशने जे सुत्रसंचलन केले ते चळवळीतील सर्वसामान्य व्यक्तींना आवडले एवढे मात्र निश्चित ..
गणेश भावा परिचय एवढा नाही, तरीही तुझ्या कारकिर्दीच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ..!

भाऊंना सूत्रसंचालनासाठी शुभेच्छा.. 💐सूत्रसंचालन म्हणजे तारेवरची कसरत असते .कुठे काही चूक भूल झाली तर ती वेळेवर निभावून न्यायची असते. असे नवनवीन सूत्रसंचालक आपल्या भागात निर्माण व्हावेत वाढावेत टिकावेत याच सदिच्छा..🙏
उत्तर द्याहटवासुत्रसंचालन छान झाले. ..
उत्तर द्याहटवाव आपण बातमी सुद्धा छान कव्हर केली दादा
मनःपूर्वक धन्यवाद
हटवामनःपूर्वक धन्यवाद
उत्तर द्याहटवा