सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

 सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित



सिंदखेडराजा:- तालुक्यातील बारलिंगा येथील सौ. अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

दि.३० जून रोजी, महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या महिला सदस्या सौ.अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी व जनतेच्या हितासाठी केलेल्या योगदानाबद्दल  'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ह्या सन्मानाने गौरवित करण्यात आले आहे. 

ह्याप्रसंगी सरपंच नलिनीताई राजेंद्र गरड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह्यावेळी सुधाकर नागरे, माजी सरपंच संजय तळेकर, राजेंद्र गरड, राजेंद्र नागरे, रवींद्र टाले, सुरेश भालेकर, संतोष नागरे व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा