बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यांत ; एकूण ८८ अपघात १७ ठार, ५७ गंभीर तर १०२ किरकोळ जखमी मदतीसाठी पोलीस केंद्रे अहोरात्र कार्यरत


बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर

गेल्या सहा महिन्यांत ; एकूण ८८ अपघात

१७ ठार, ५७ गंभीर तर १०२ किरकोळ जखमी

मदतीसाठी पोलीस केंद्रे अहोरात्र कार्यरत

सिंदखेडराजा:- तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील मेहकर नजीकच्या फर्दापुर ते दुसरबीड मार्गावर उद्घाटनाच्या ११ डिसेंबर २०२२ ते नुकत्याच संपलेल्या मे २०२३ ह्या एकूण ६ महिन्याच्या कालावधीच्या अखेर पर्यंत एकूण ८८ अपघात घडले असून, १७ प्रवाश्यांचा मृत्यू, ५७ गंभीर जखमी तर १०२ किरकोळ जखमी झाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर, २०२२ रोजी नागपूर ते मुंबई ह्या एकूण ७१० किलोमीटर मार्गाच्या नागपूर ते शिर्डी अश्या ५७० किलोमीटर मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते.

पहिला टप्प्यात मार्गाचे काम पूर्ण झाले होते. मात्र त्या दरम्यानच्या पेट्रोल पंप, पंक्चर आदि अगदी प्राथमिक सोयीसुविधा सोडल्या तर इतर सुविधा अजूनही अपूर्णच आहेत.

याचवेळी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर दुसरबीड, ता. सिंदखेडराजा येथे पोलीस मदत केंद्र तर फर्दापुर, ता. मेहकर येथे उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे.

ह्या दोन्ही केंद्रांच्या दरम्यान महिना निहाय घडलेले अपघात, ठार व जखमी प्रवाश्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये घडलेले अपघात १९, १ ठार, ५ गंभीर तर २३ किरकोळ जखमी, जानेवारी २०२३ मध्ये १५ अपघात, ४ ठार, ७ गंभीर तर १५ किरकोळ जखमी, फेब्रुवारी २३ मध्ये १४ अपघातात एकही ठार नाही. मात्र १२ गंभीर व ११ किरकोळ जखमी, मार्च २०२३ मध्ये १० अपघात, ६ ठार, १५ गंभीर, १४ किरकोळ जखमी, एप्रिल २३ मध्ये १० अपघातात ४ ठार, १० जखमी तर ११ किरकोळ जखमी, मे २०२३ मध्ये एकूण २० अपघातात, २ ठार, ८ गंभीर तर २८ किरकोळ जखमी झाले आहेत.

याप्रमाणे एकूण ८८ अपघातात १७ प्रवासी ठार, ५७ गंभीर जखमी तर १०२ किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये दुसरबीड केंद्राच्या कक्षेत ५५ अपघातात एकूण ८ ठार, ४५  गंभीर तर ६५ किरकोळ जखमी, तर फर्दापुर उपकेंद्राच्या कक्षेत एकूण ३३ अपघातात १० ठार, १२ गंभीर तर ३७ किरकोळ जखमी झालेल्या आहेत.



महामार्गाच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व बुलढाणा विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशानुसार प्रभारी पोलीस अधिकारी संदीप इंगळे, अरुण बकाल, उपनिरीक्षक शैलेश पवार, राजू गायकी, गजानन उज्जैनकर व कर्मचारी उदय गीते, गोविंदा उबरहंडे, रमेश काळे, विठ्ठल काळुसे, संतोष वनवे, दिनकर राठोड, विनोद राठोड, विष्णू गोलांडे, संदीप किरके, शेख नजीर, निवृत्ती सानप, विजय आंधळे, प्रवीण पोळ, विकास कोळी, इमरान शेख, गणेश सुसर, मुकेश जाधव आदिंच्या चोख कर्तव्यातून महामार्गावरY अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पुरवली जाते. त्यामध्ये जखमींना त्वरित दवाखान्यात पोहचवणे, अपघात स्थळावरील अडचणी दूर करुन वाहतूक सुरळीत करणे. एवढेच नव्हे तर पेट्रोल पंप, टोल प्लाझा आदि ठिकाणी वाहनचालकांसह प्रवाशांना देखील मार्गाच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी घेऊन वाहतूक नियम तसेच अपघात होऊ नये म्हणून ड्रायव्हिंग करतांना कोणत्या बाबी करायच्या व कोणत्या बाबी टाळायच्या याबाबत प्रबोधन करीत असतात. दुसरबीड केंद्र व फर्दापुर उपकेंद्राच्या वतीने आतापर्यंत १५० च्या वर प्रबोधन कार्यक्रम घेतले तरीही अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.



महामार्गावर चालकांना प्राधान्याने आराम मिळण्यासाठीच्या तसेच इतरही सोयीसुविधांची कामे वेगाने पूर्णत्वास आली तर अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, असेही ह्या मार्गावर ड्रायव्हिंग तसेच प्रवास केलेल्या बहुतेकांचे म्हणणे आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा