अभिनंदन ..! प्रवीण, माझंही मन तुझ्यासारखंच अगदी मोठ्ठं व्हावं ..

 अभिनंदन ..!

प्रवीण,

माझंही

मन तुझ्यासारखंच 

अगदी मोठ्ठं व्हावं ..



खरं तर प्रवीणला खूप लहानपणापासून ओळखतो.

तो किनगावराजाचा भाचा पण आमच्या बाबुराव सरांचा (इथं बोलीभाषेतील शब्दांत बाबुराव मास्तर लिहायचे होते.) मुलगा ..

मधल्या काळातील काही बाबीपण लिहीत नाही. त्यामुळे आम्हा दोघांनाही पारिवारिक संबंधात त्रास होतो.

नातेवाईक संबंध खूप दाट, पण मी स्वतः त्यापलीकडे जाऊन, माणुसकीचा धर्म निभावणारा. अगदी ११ किंवा १२ वीत वैद्यकीय शाखेत (एमबीबीएस) जाण्याची योग्यता असतांनाच, स्व. सुरेश सोनुने ह्यांनी माझ्या वडिलांना आग्रह करीत मला राजकारणात आणले. त्यावेळी मी माझे दाजी स्व. भास्करराव डोईफोडे ह्यांचे दुकान संभाळायचो. तीन चार वर्षानंतर माझे पदवीचे वय असेल. स्वतःसाठी तसेच समाजासाठी काहीतरी करावे ही उर्मी मनात होती. पण दरम्यानच्या काळात डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांनी स्वतः काही बाबींची पूर्तता करीत व त्यानुसार शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर, मला साखरखेर्डा येथील शाळेत नियुक्ती दिली. देऊळगावराजा येथून साखरखेर्डा येथे आलो. स्व. सुरेशभाऊंच्या वैचारिक भूमिकेतून आपण स्वतः काहीतरी चळवळ उभारावी, ह्यासाठी प्रयत्नरत होतो. त्यासाठी जमवाजमव करीत आतांनाच कुटुंब, नातेवाईक, संसार नव्हेतर स्वतःला सांभाळणे आदि बाबतीत वेळ खर्च झाला. त्याचकाळात प्रविणने लोकजागर परिवार सुरु केला. त्यावेळी असं वाटलं की, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत आहेत. स्वतःहोऊन चळवळीला वेळ दिला. संघटन म्हणून सोबत आलो. प्रवीण व माझी त्यावेळची ओळख कार्यकर्ता म्हणूनच झाली. त्यापूर्वी मी माझ्या वयाची अनेक वर्षे राजकीय व सामाजिक चळवळीत व्यतीत केली होती. पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलो होतो.

वयाने मी मोठा असल्याने व प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने प्रविणने, त्याला जी समजली ती माझी वृत्ती पाहून मला "दादा" म्हणण्यास सुरुवात केली.

अहो, मी स्वतः शिक्षक असतांनाही, प्रवीणच्या त्या वक्तव्याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण परिसरात, शिक्षक किंवा सर म्हणून मला ओळखत असतांनाही प्रवीणच्या निस्वार्थी प्रेमापोटी "दादा" हे संबोधन प्रामाणिकपणे स्वीकारावे लागले.

एक गोष्ट मान्य करावी लागेल की, निश्चितच प्रवीणमुळे माझ्या राजकीय, सामाजिक, वैचारिक, अभ्यासक अशा अनेक प्रकारच्या कक्षा रुंदावल्या आहेतच.

तो आपल्या सगळ्यांचा प्रवीण आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या पतसंस्थेवर अध्यक्ष म्हणून अविरोध निवडल्या जातोय, त्यातूनच प्रवीण जिल्हास्तरावर आपल्या वैचारिक कर्तृत्वाची छाप पाडतोय.

उर भरुन अभिनंदन भावा ..!

तुझ्या वैचारिक पातळीवर आम्हीही कुठेतरी असावे, असे माझ्यासकट अनेक मित्रांना वाटतेय. आमचंही मन तुझ्यासारखंच मोठ्ठं होऊ देत.

प्रवीण पुनश्च एकदा अभिनंदन ..!

टिप्पण्या

  1. उत्कृष्ट लेख सर जी,खरोखरच प्रविणभाऊ अत्यंत गोड स्वभावाचा व्यक्ती आहे

    उत्तर द्याहटवा
  2. दादा....खूप छान माहिती दिली

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा