गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती रुग्णवाहिका सेवा व डॉक्टरांच्या कसबाचे होत आहे कौतुक ..!


 गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती

रुग्णवाहिका सेवा व डॉक्टरांच्या कसबाचे होत आहे कौतुक ..!


सिंदखेडराजा:- नायगाव बु. येथील एका गर्भवती विवाहितेला १०८ रुग्णवाहिकेतून बाळंतपणासाठी चिखली येथे नेण्यात येत होते. अवघडलेली स्थिती असतांनाच प्रवासादरम्यान तिला मध्येच कळा येण्यास सुरुवात झाली. परंतु, त्यावेळी रुग्णवाहिकेत कर्तव्यावर असणाऱ्या डॉ. गणेश शिवराज रंगदळ यांनी त्या गंभीर परिस्थितीत आपल्या वैद्यकीय कौशल्याचे कसब पणाला लावत बाळंतपण करीत अवघडल्या स्थितीतून विवाहित युवतीची सुटका केली. आज दि.२० एप्रिल, गुरुवारी झालेल्या ह्या प्रसंगामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

१०८ रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व डॉक्टरांना एक कॉल आला.

त्याचक्षणी अवघडलेली गर्भवती हे लक्षात घेत, साखरखेर्डा येथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर आणि चालकाने लगबगीने प्रवासाला सुरुवात केली.

नायगाव बु. ता. मेहकर येथील दिवस भरत आलेली गर्भवती विवाहिता शिवकन्या खरात हीला व तिच्या सोबत आणखी दोन महिलांना सोबत घेत, शिवकन्या हिच्या बाळंतपणासाठी १०८ रुग्णवाहिकेतून नायगाव बु. येथून चिखली नेण्यासाठी वाहन उभे झाले. विवाहितेला तातडीने वाहनात घेत, लव्हाळा येथून मेहकर ते  चिखली मार्गावर प्रवास सुरू झाला. परंतु, प्रवासादरम्यान कोलारा फाट्याजवळ विवाहितेच्या बाळंतपणासाठी अवघडल्या प्रकाराची अडचण निर्माण झाली. त्यावेळी रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गणेश शिवराज रंगदळ व वाहनचालक दीपक खंडारे हे कर्तव्यावर होते.  त्या दोघांनी हिंमत करीत मोठ्या धैर्याने आपले वैद्यकीय कसब पणाला लावत शिवकन्या खरात व सोबतच्या महिलांच्या सहकार्याने सुखरुप व व्यवस्थित बाळंतपण केले. शिवकन्या हिस पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना पुढील उपचारासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. आज दि. २० एप्रिल, गुरुवारी घडलेल्या ह्या अवघड प्रसंगाची वाच्यता कर्णोपकर्णी परिसरात झाली. त्यामुळे डॉ. गणेश रंगदळ व वाहनचालक दीपक खंडारे ह्यांच्यासह १०८ रुग्णवाहिका सेवेचे परिसरातील जनतेत आभार व कौतुक व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा