पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल

इमेज
  भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल सिंदखेडराजा:- भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला एका बहिणीने आपल्या भावाला यकृतदान करीत समाजात एक स्पृहणीय आदर्श निर्माण केला आहे.  दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा दिवस भावाबहिणीच्या नात्यातील महत्वाचा दिवस असतो. त्यानिमित्ताने भावाच्या घरी म्हणजेच माहेरी हक्काधिकाराने जाता येत असते. भाचे मंडळी सुद्धा मामाच्या घरी जाण्यासाठी आतुर असतात. त्यामुळेच दिवाळीचा सण आला की सासुरवाशीण महिला माहेराकडे डोळे लावून आठवण काढत असतात.  तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सौ. दुर्गा अरुण धायतडक हिचे माहेर देऊळगावराजा तालुक्यातील  अंढेरा हे आहे. तिचा भाऊ हॉटेल व्यावसायिक रमेश नागरे यांची प्रकृती काही दिवसांपासून अधूनमधून खराब होत होती. त्यामुळे लहान भाऊ संतोष नागरे व कुटुंबीयांनी त्यांना  मोठमोठ्या दवाखान्यात निदान व उपचारासाठी नेले. त्यात यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. परंतु त्यामध्ये यकृत बिघाड जास्तच असल्याचे आढळले. त्यामुळे औषधोपचाराने आजार नियंत्रण साध्य होणार नाही. मात्र यकृत अवरोपण केल्यास पूर्णपणे आ...

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा 'बर्निंग बस' चा थरार .. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अनर्थ टळला तेहतीस जण बचावले

इमेज
  समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा 'बर्निंग बस' चा थरार .. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अनर्थ टळला तेहतीस जण बचावले  सिंदखेडराजा : अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर चॅनल २८० वर अचानक आग लागली. या घटनेत बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालकांसह तेहतीस प्रवाश्यांचे प्राण बचावले.  एमएच ३७ टी ५४५४ क्रमांकाची बस अमरावती येथून  पुणे कडे जात होती.  ३० सप्टेंबर, शनिवारी रात्री निघाली होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्र.  २८० जवळ बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत, बस रस्त्याच्या बाजुला थांबवली व ताबडतोब सर्वच प्रवाशांना खाली उतरवले. ह्या घटनेची माहिती मिळताच फर्दापूर चाैकीचे पीएसआय उज्जैनकर, पोहेकाॅ काेळी, पाेकाॅ नाझीर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्यूआरव्ही पथकाला पाचारण करीत, वेळीच आग विझवण्यात आली. ह्या घटनेतील चालक शेख रज्जाक शेख आयुब, रा. दारव्हा, जि. यवतमाळ आणि प्रविण मुंडे, रा. मंगरुळपीर, जि. वाशीम यांच्यासह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत. अचानक घडलेल्या झालेल्या ह्या प्रकाराने भयभीत झा...

खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

इमेज
  खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील खैरव येथील दिनकर बाळाजी भुसारी वय ७२ वर्षे यांनी विषारी औषधी प्राशन करीत आत्महत्या केली आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या दिनकर भुसारी यांच्याकडे अंदाजे अडीच एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी व नातू पणतू आदि सदस्य आहेत. पिढ्यानपिढ्याची गरीबी, त्यात कर्करोगाचे आजारपण, पेरणी व पिकांची मशागत आदि बाबींवर झालेला खर्च, त्यामुळे औषधी घेण्यासाठीही रक्कम नव्हती. त्यातच पीक परिस्थिती बरी असतांनाच पावसाने दिलेली उघडीप त्यातून येत्या काळातील संभाव्य नापिकी आदि अनेक चिंतांमधून त्यांनी काल दि. २५ ऑगस्ट, शुक्रवारी विषारी औषधी प्राशन केली. उपचारासाठी देऊळगाव मही येथे नेल्यावर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील इस्पितळात हलविले असता, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे.  यासंदर्भात माजी सरपंच संजय तळेकर, पोलीस पाटील बबन घुगे आदिंनी संबंधित गावपातळीवरील कर्मचारी यांना माहिती दिली आहे. जालना येथे शवविच्छेदन झाल्यावर आज दुपारी बारा वा. सुमारास खैरव येथ...

आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..! मनात काहूर अन हुरहूर ...!!

इमेज
  आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..! मनात काहूर अन हुरहूर ...!! दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे दि. १९ जुलै २०२१ रोजी मला कॉल करुन एका व्यक्तीने व्हीटी सरांच्या निधनाची बातमी कळवली. विश्वास बसतच नव्हता, कारण रोज किंवा तिसऱ्या दिवशी भेट होत होती. मात्र त्यांना हृदयविकार असल्याचे माहीत होते. त्यामुळे जागदरी, ता. सिंदखेडराजा येथे संपर्क साधून विचारले असता, ती माहिती खरी असल्याचे सांगण्यात आले. प्रचंड हादरलो.  आठवणींनी मनात काहूर उठले. जागदरी ह्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक एक बाब समोर ठेऊन, काय काय अन कसे कसे नियोजन करायचे? चर्चेतून ठरत होते. त्याचवेळी त्यात खिळ घालणाऱ्या घटकांचा कसा बंदोबस्त करायचा हेही नजरेसमोर होते. त्याच दृष्टिकोनातून व्हीटी सरांच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वीच राजकीय, सामाजिक आदि विविध प्रकारची  उपाययोजना करण्यासाठी बुलढाणा येथे जाऊन आलो होतो. दिवसभर सोबत होतो. त्यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवदास रिंढे सोबत होते. गावाच्या विकासासाठी राजकारण विरहित फक्त मैत्री जपणारा शिवदास आमच्या सोबत दिवसभर होता.  जागदरी गावाच्या विकासासाठी व्ही...

लाड झालेत लाखांचे ; करोडोंची किंमत नाही? मूल्य मात्र मोजावे लागणार ..

इमेज
 लाड झालेत लाखांचे करोडोंची किंमत नाही? मूल्य मात्र मोजावे लागणार .. एक काकुळतीला आलेला शेवटच्या क्षणाचा प्राणी .. आयुष्यात त्याने विरोध केला असेल, कुणाचे वैर पत्करले नाही, आणि दुश्वासही केला नाही. जगणं भारी होत असतांना घरगुती बाबतीवरुन तो कित्येकांच्या नजरेत भरला असावा. अनेकांना मदत देत, त्याने फक्त भलाईचाच धडा गिरवला. तोच आज व्याकुळ होतोय. ज्यांच्यासाठी खूप काही सोडून जावंसं वाटतंय तेच दुश्वास करताहेत. सुरेश भटांच्या भाषेत इथे एकच अध्याहृत आहे की, "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते." त्याचवेळी जगण्याची उमेद असणारा तो म्हणाला की, कितीही वेळा झाले तरी छळ सोसणार,  पण जगणे काय असते? ते तर ह्याचजन्मी दाखवून देणार. कारण त्याने सोसलेलं तो कधीच बोलला नाही. जगण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्यांच्या आयुष्यात केवळ शेवटच्या ओळी त्याच्याच असतील. मोकळा श्वास दुर्मिळ होतो तेंव्हा आयुष्यात संघर्ष करीत करीत .. जगण्याचा श्वास घेत  इथपर्यंत जरी उरला असशील .. जगण्याची नाळ समजण्यासाठी शोध घेत घेत फुका वाया गेला असशील .. तुझ्या भरवस्यावर जगण्याची इच्छा असल्याने ते कृत्य वाईट करीत असतील .. त्य...

सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

इमेज
  सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित सिंदखेडराजा:- तालुक्यातील बारलिंगा येथील सौ. अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दि.३० जून रोजी, महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या महिला सदस्या सौ.अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी व जनतेच्या हितासाठी केलेल्या योगदानाबद्दल  'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ह्या सन्मानाने गौरवित करण्यात आले आहे.  ह्याप्रसंगी सरपंच नलिनीताई राजेंद्र गरड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह्यावेळी सुधाकर नागरे, माजी सरपंच संजय तळेकर, राजेंद्र गरड, राजेंद्र नागरे, रवींद्र टाले, सुरेश भालेकर, संतोष नागरे व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

इमेज
यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव  गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न सिंदखेडराजा:- यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. ते मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व त्यामध्ये अपयशाने गर्भगळीत न होता, त्याकडे दुर्लक्ष करीत, अभ्यासात शेवटपर्यंत सातत्य ठेवावे लागते, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेतील गुणवंत गौरव गंगाधर कायंदे याने केले. देऊळगावराजा येथील योगीराज लॉन्स येथे दि. २५ जून, रविवारी संत श्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठान बुलढाणा-जालना यांच्यावतीने आयोजित 'प्रथम विदर्भ वंजारी समाजरत्न' सन्मान व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात गौरव कायंदे सत्काराला उत्तर देत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे, तर हभप सानप गुरुजी, प्रा.गंगाधर कायंदे, राजेंद्र वाघ, जालिंदर बुधवत, विनोद वाघ, सौ. नंदाताई कायंदे, सौ. शारदाताई जायभाये, आत्माराम कायंदे, भगवान मुंढे, देवानंद कायंदे, दादाराव खार्डे, गणेश मांटे, प्रकाश गीते, रमेश कायंदे, तोताराम  नागरे, सावळाराम नागरे, बद्री बोडखे, डॉ. केशव आघाव, युवराज नागरे, वामनराव आघाव, अमोल काक...

तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध .. एकूण ४ हजार ६६४ जागांवर पदभरती

इमेज
  तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध .. एकूण ४ हजार ६६४ जागांवर पदभरती  बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. (सौजन्य:- लोकसत्ता टीम, नागपूर) तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, ४ हजार ६६४ जागांवर पदभरती, जाणून घ्या कुठल्या जिल्ह्यात किती जागा असणार? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स) नागपूर : बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या बातमीमुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील पुण्यासह नाशिक,...

आषाढ महिना? नेमके काय??

इमेज
  आषाढ महिना? नेमके काय?? आषाढ महिना वारकरी संप्रदायातील प्रत्येकासाठी महत्वाचा व पवित्र समजला जातो. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे. यंदा आषाढ महिना सोमवार, १९ जून २०२३ ला सुरु होणार असून तो सोमवार, १७ जुलै रोजी संपत आहे. पंचांगानुसार, चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षाचा चौथा महिना म्हणजेच आषाढ महिना होय. हा इंग्लिश कॅलेंडरच्या जून किंवा जुलै महिन्यात येतो. या वेळी भारतात भरपूर पाऊस पडत असल्याने हा पावसाळ्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. खूप उष्णता सहन केल्यानंतर या महिन्यात आपल्याला थोडास दिलासा मिळतो. या महिन्यापासून पावसाळा सुरू होतो. हवामानातील बदलामुळे या महिन्यात आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. या हंगामात संसर्गाचा धोका लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत या काळात पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या. (Sanskruti)आषाढ महिन्यात खाण्यापिण्याच्या या गोष्टींची काळजी घ्या- या महिन्यात पाणी असलेली फळे खा.- कमीत कमी तेलाच्या वस्तूंचे सेवन करा.- शिळे अन्न खाऊ नका. आजपासून प्रारंभ होणाऱ...

समृद्धी महामार्गावर जालना येथील दोन डिझेल चोरांना गस्त पथकाने पकडले

इमेज
  समृद्धी महामार्गावर जालना येथील दोन डिझेल चोरांना  गस्त पथकाने पकडले .. सिंदखेडराजा:- समृद्धी महामार्गावर चालकांच्या आरामासाठी उभ्या असलेल्या ट्रक मधील डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात गस्तपथक पोलिसांना यश आले आहे. यापुढे डिझेल चोरीला आळा बसणार असा विश्वास महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र दुसरबीड व उपकेंद्र फर्दापूर दरम्यान उभ्या असलेल्या जड वाहनातील डिझेल चोरणारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. महामार्गावर पेट्रोल पंप किंवा टोलनाक्यांचा आसरा घेत अनेक वाहन चालक हे रात्रीला आराम करण्यासाठी, आपले वाहन तेथे सुरक्षित असल्याच्या भावनेने उभे करतात. वाहन चालकांना झोप लागल्यानंतर डिझेल टाकीचे लॉक तोडून गाडीमधील डिझेल  स्वयंचलीत मोटारपंपाच्या साह्याने पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या स्वतःच्या कॅनमध्ये भरून चोरटे मोकळे होतात. ह्या घटनांच्या  बऱ्याचशा वाहनचालकांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यासाठी शोध मोहीम राबवूनही डिझेल चोर हाती लागत नव्हते. नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी डिझेलच्या कॅन असलेल्या गाडीचा अपघा...

धन्यवाद ..! किरण माने सर 🙏

इमेज
  धन्यवाद ..! किरण माने सर   🙏 शरद पवारांना धमकी देणारी सागर बर्वे नामक जी व्यक्ती अटक झालीय, त्यासंदर्भात फेसबुकवर अभिनेता किरण माने यांनी आज दि. १३ जून, २०२३, मंगळवारी एक पोस्ट टाकली आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेल्यांनी विचलित होऊन अथवा खचून जाऊ नये,   यासाठी त्यामधील एक उतारा खूप महत्त्वाचा आहे. तो येथे देत आहे.   👇 यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला 'रूतबा' कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात. कारण आपल्याला, आपल्या शब्दांना, विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं उलट असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं... शत्रूवर नजर रोखायची... आणि गालातल्या गालात हसायचं .. 'पठाण' मधल्या शाहरुख सारखं .. क्यों की हमारी ताकत हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के, शोर से पता चलती है !   😊

समृद्धी महामार्गावर अपघातात डिग्रस, ता. देऊळगावराजा येथील मांटे कुटुंबातील तीन ठार गाव व परिसरात शोककळा

इमेज
  समृद्धी महामार्गावर अपघातात डिग्रस, ता. देऊळगावराजा येथील  मांटे कुटुंबातील तीन ठार गाव व परिसरात शोककळा सिंदखेडराजा:- समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापुर जवळ सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस येथील तिघेजण ठार झाल्याची घटना आज दि. ४ जून, रविवारी सकाळी ४.०० वा. सुमारास घडली आहे. डिग्रस येथील मांटे कुटुंबीय टाटा निस्सान क्र. एम. एच. २८ ए झेड  ७५४६ ह्या वाहनाने वाशिम येथे आयोजित असलेला कुटुंबातीलच लग्नसोहळा आटोपून मालेगावकडून परत येत होते. दरम्यान फर्दापुर नजीकच्या चॅनेल क्र. २८३ जवळ वाहन थांबवून, त्यातील तिघे जण लघवी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडविले. या अपघातात विजय शेषराव मांटे, वय ४८, तुषार गजानन मांटे, वय ३४ व ओम विजय मांटे, वय २० हे तिघेजण ठार झाले आहेत. वाहनात एकूण सहाजण असल्याचीही माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच फर्दापुर पोलीस मदत उपकेंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मेहकर येथ...

साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९८.३३ टक्के सहा पैकी दोन विद्यालयांचा निकाल शंभर टक्के ..

इमेज
  साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९८.३३ टक्के सहा पैकी दोन विद्यालयांचा निकाल शंभर टक्के .. साखरखेर्डा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९८.३३ टक्के एवढा लागला असून, एकूण सहा पैकी दोन माध्यमिक विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे. जिजामाता विद्यालयाचे एकूण १२८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२७ उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी ९९.२१ आहे. या १२७ पैकी ६४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर अवघे २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्री. शिवाजी हायस्कूलचे १६८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन त्यातील १६७ झाल्याने टक्केवारी ९९.४० आहे. अनिकेत इंग्लिश स्कुलचे ३५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. सहकार विद्या मंदिरचे ५४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. एस. इ. एस. हायस्कुलचे ११९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन त्यापैकी ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ट...

निकाल दहावीचा:- सिंदखेडराजा, जिल्हा व तालुक्यांच्या निकालाची आकडेवारी

इमेज
निकाल दहावीचा  ९५.७९ टक्के घेऊन सिंदखेडराजा जिल्ह्यात तिसरा जिल्हा व तालुक्यांच्या निकालाची आकडेवारी सिंदखेडराजा:- आज दि. २ जून, शुक्रवारी जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तालुक्यातील त्रेचाळीस माध्यमिक विद्यालयांचा सरासरी निकाल एकूण ९५.७९ टक्के एवढा लागला आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण २ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २ हजार ७५७ विद्यार्थ्यी परीक्षेला सामोरे गेले. यापैकी २ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार १४१ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, १ हजार १०० प्रथम श्रेणीत, ३५९ द्वितीय श्रेणीत तर ४१ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील एकूण ४३ विद्यालयांपैकी ५ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये स्वामी विवेकानंद सोनोशीचे ६७ विद्यार्थी, कै. भास्करराव शिंगणे दरेगावचे २६, सहकार सिंदखेडराजाचे ७०, अनिकेत साखरखेर्डाचे ३५ व सहकार साखरखेर्डाचे ५४ असे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील दहावीच्या निकालात...

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यांत ; एकूण ८८ अपघात १७ ठार, ५७ गंभीर तर १०२ किरकोळ जखमी मदतीसाठी पोलीस केंद्रे अहोरात्र कार्यरत

इमेज
बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यांत ;  एकूण ८८ अपघात १७ ठार, ५७ गंभीर तर १०२ किरकोळ जखमी मदतीसाठी पोलीस केंद्रे अहोरात्र कार्यरत सिंदखेडराजा:- तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील मेहकर नजीकच्या फर्दापुर ते दुसरबीड मार्गावर उद्घाटनाच्या ११ डिसेंबर २०२२ ते नुकत्याच संपलेल्या मे २०२३ ह्या एकूण ६ महिन्याच्या कालावधीच्या अखेर पर्यंत एकूण ८८ अपघात घडले असून, १७ प्रवाश्यांचा मृत्यू, ५७ गंभीर जखमी तर १०२ किरकोळ जखमी झाले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर, २०२२ रोजी नागपूर ते मुंबई ह्या एकूण ७१० किलोमीटर मार्गाच्या नागपूर ते शिर्डी अश्या ५७० किलोमीटर मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. पहिला टप्प्यात मार्गाचे काम पूर्ण झाले होते. मात्र त्या दरम्यानच्या पेट्रोल पंप, पंक्चर आदि अगदी प्राथमिक सोयीसुविधा सोडल्या तर इतर सुविधा अजूनही अपूर्णच आहेत. याचवेळी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर दुसरबीड, ता. सिंदखेडराजा येथे पोलीस मदत केंद्र तर फर्दापुर, ता. मेहकर येथे उपकेंद्र स्थापन करण...

बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे?

इमेज
बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे? मग बघून घ्या ... अमरावती विभागातील कोणता जिल्हा व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा निकाल व क्रमांक कितवा आहे ....! सिंदखेडराजा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्यातील तालुका निहाय निकाल पुढीलप्रमाणे .. निकालामध्ये देऊळगावराजा तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार २७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार  २६२ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १६८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५५७ प्रथम श्रेणीत, ४११ द्वितीय श्रेणीत, ८६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९६.८३ एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिखली तालुका असून, परीक्षेसाठी एकूण ४ हजार १७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार  १५० विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८९२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ८१६ प्रथम श्रेणीत, १ हजार १२० द्वितीय श्रेणीत, १६६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ३ हजार ९९४ विद्यार्थी उत्...

बारावी परीक्षेत सिंदखेडराजा तालुका ९५ टक्के पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के उत्तीर्ण

इमेज
सिंदखेडराजा तालुका : बारावीचा निकाल ९५ टक्के पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के उत्तीर्ण तर विज्ञान विषयांत पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के सिंदखेडराजा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात तालुक्यात असलेल्या एकूण ३० कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल एकूण ९५.०७ टक्के एवढा लागला आहे. यामध्ये संजय गांधी, धांदरवाडी, अटलबिहारी वाजपेयी, राहेरी, जान्हवी, दुसरबीड, आदर्श, सिंदखेडराजा व उत्कर्ष, सिंदखेडराजा ह्या पाच कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण ३ हजार ८६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ हजार ६४ विद्यार्थ्यी परीक्षेला सामोरे गेले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार यापैकी एकूण २९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, १३२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २१४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. जिजामाता क. म. वि.  सिंदखेडराजा, ३०६ पैकी ३०२ विद...

एसटी बस अक्षरशः अर्धी चिरली अपघातात ६ ठार तर १६ गंभीर

इमेज
  कंटेनर व एसटी बसची समोरासमोर धडक एसटी बस अक्षरशः अर्धी चिरली अपघातात ६ ठार तर १६ गंभीर   विशेष प्रतिनिधी सिंदखेडराजा:- तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सी वर दुसरबीड ते सिंदखेडराजा दरम्यान आज दि. २३ मे, मंगळवारी सकाळी ६.०० वा. च्या सुमारास पळसखेड चक्का फाट्याजवळ कंटेनर व बस ही दोन वाहने एकमेकांना समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला. या घटनेत कंटेनरने बसच्या चालकाची बाजू अर्ध्या भागापर्यंत अक्षरशः चिरत नेली होती. या घटनेची माहिती मिळताच  किनगावराजा ठाणेदार युवराज रबडे व त्यांचे सहकारी कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व उपस्थित पळसखेड ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरु करीत, सर्व अपघात बधितांना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  त्यावेळी ६ व्यक्ती मृत झाल्या होत्या. त्यात ३ महिला व ३ पुरुष, ज्यामध्ये दोन्हीही चालकांचा समावेश होता. तर १६ व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत होत्या. गंभीर व्यक्तींना पुढील उपचारासाठी तातडीने जालना येथे हलविण्यात आले. तर किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले. दुर्घटनेतील बस मेहकर आगारा...

वीज पडून १६ बकऱ्या जागीच ठार, रताळी येथील घटना

इमेज
सिंदखेडराजा तालुक्यात सकाळीच अवकाळी पाऊस वीज पडून १६ बकऱ्या जागीच ठार रताळी येथील घटना सिंदखेडराजा:-  सिंदखेडराजा:- तालुक्यातील काही भागात आज दि. ३० एप्रिल, रविवारी सकाळी वीजांच्या कडकडाटात तासभर अवकाळी पाऊस झाला.  त्यामध्ये साखरखेर्डा नजीकच्या रताळी येथे  सकाळी ९.०० वा. सुमारास वीज पडून भिकाजी सखाराम जाधव ह्यांच्या मालकीच्या १६ बकऱ्या जागीच मरण पावलेल्या आहेत. सकाळी बकऱ्या सोडून शशिकला तेजराव आव्हाळे व शेतमालक भिकाजी सखाराम जाधव हे दोघेही शेतात बकऱ्या चारत होते. त्याचवेळी बाजूच्या निंबाच्या झाडावर वीज कोसळली. ह्यावेळी १६ बकऱ्या ठार झाल्या मात्र शेत मालक व महिलेने ट्रॅक्टर ट्रॉली खाली आश्रय घेतला होता. त्यामुळे सुदैवाने ते दोघे बचावले. घटनेचा पंचनामा करण्यासाठी महसूलचे तलाठी शेळके व पोलीस विभागाचे कर्मचारी तातडीने पोहोचले असल्याची माहिती सरपंच सौ. उषा समाधान पाटील यांनी दिली आहे.

अभिनंदन ..! प्रवीण, माझंही मन तुझ्यासारखंच अगदी मोठ्ठं व्हावं ..

इमेज
  अभिनंदन ..! प्रवीण, माझंही मन तुझ्यासारखंच  अगदी मोठ्ठं व्हावं .. खरं तर प्रवीणला खूप लहानपणापासून ओळखतो. तो किनगावराजाचा भाचा पण आमच्या बाबुराव सरांचा (इथं बोलीभाषेतील शब्दांत बाबुराव मास्तर लिहायचे होते.) मुलगा .. मधल्या काळातील काही बाबीपण लिहीत नाही. त्यामुळे आम्हा दोघांनाही पारिवारिक संबंधात त्रास होतो. नातेवाईक संबंध खूप दाट, पण मी स्वतः त्यापलीकडे जाऊन, माणुसकीचा धर्म निभावणारा. अगदी ११ किंवा १२ वीत वैद्यकीय शाखेत (एमबीबीएस) जाण्याची योग्यता असतांनाच, स्व. सुरेश सोनुने ह्यांनी माझ्या वडिलांना आग्रह करीत मला राजकारणात आणले. त्यावेळी मी माझे दाजी स्व. भास्करराव डोईफोडे ह्यांचे दुकान संभाळायचो. तीन चार वर्षानंतर माझे पदवीचे वय असेल. स्वतःसाठी तसेच समाजासाठी काहीतरी करावे ही उर्मी मनात होती. पण दरम्यानच्या काळात डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांनी स्वतः काही बाबींची पूर्तता करीत व त्यानुसार शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर, मला साखरखेर्डा येथील शाळेत नियुक्ती दिली. देऊळगावराजा येथून साखरखेर्डा येथे आलो. स्व. सुरेशभाऊंच्या वैचारिक भूमिकेतून आपण स्वतः काहीतरी चळवळ उभारावी, ह्यासाठी प...

गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती रुग्णवाहिका सेवा व डॉक्टरांच्या कसबाचे होत आहे कौतुक ..!

इमेज
  गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती रुग्णवाहिका सेवा व डॉक्टरांच्या कसबाचे होत आहे कौतुक ..! सिंदखेडराजा:- नायगाव बु. येथील एका गर्भवती विवाहितेला १०८ रुग्णवाहिकेतून बाळंतपणासाठी चिखली येथे नेण्यात येत होते. अवघडलेली स्थिती असतांनाच प्रवासादरम्यान तिला मध्येच कळा येण्यास सुरुवात झाली. परंतु, त्यावेळी रुग्णवाहिकेत कर्तव्यावर असणाऱ्या डॉ. गणेश शिवराज रंगदळ यांनी त्या गंभीर परिस्थितीत आपल्या वैद्यकीय कौशल्याचे कसब पणाला लावत बाळंतपण करीत अवघडल्या स्थितीतून विवाहित युवतीची सुटका केली. आज दि.२० एप्रिल, गुरुवारी झालेल्या ह्या प्रसंगामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय अधिकारी यांचे कौतुक होत आहे. १०८ रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व डॉक्टरांना एक कॉल आला. त्याचक्षणी अवघडलेली गर्भवती हे लक्षात घेत, साखरखेर्डा येथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर आणि चालकाने लगबगीने प्रवासाला सुरुवात केली. नायगाव बु. ता. मेहकर येथील दिवस भरत आलेली गर्भवती विवाहिता शिवकन्या खरात हीला व तिच्या सोबत आणखी दोन महिलांना सोबत घेत, शिवकन्या हिच्या बाळंतपणासाठी १०८ रुग्णवाहिकेतून नायगाव बु. येथून चिखली नेण्यासा...

साखरखेर्ड्यात नागरिकांना कुणीही वाली नाही. आलिया भोगाशी असावे सादर ..

साखरखेर्ड्यात नागरिकांना कुणीही वाली नाही.  आलिया भोगाशी असावे सादर .. वीज मंडळ ते कंपनी प्रवासात हाती दैवदुर्विलासच .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील वीज कंपनीतील जबाबदार यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे परिसरातील ग्राहक नागरिकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. ज्यांच्याकडे प्रतिनिधित्व आहे, ते सुद्धा मला काय त्याचे? ह्या भूमिकेत दिसून येत आहेत. वीज मंडळ ते वीज कंपनी ह्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रवासात साखरखेर्डा येथील संबंधित कार्यालय व त्यांची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे द्योतक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा कधीही सुरळीत असल्याचे दिसून आले नाही. वेळोवेळी नव्हेतर तासातासाला उद्भवणारा बिघाड हा पाचवीलाच पुजलेला आहे की काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे.  वीज मंडळ ते कंपनी ह्या अनेक वर्षांच्या प्रवासात वीज पुरवठा करण्यासाठी परिसरात असलेल्या सुविधेतील खांब, तारा आदि एकूण एक साहित्य तसेच आहे. त्यात जुजबी बदल केल्या जातात. हे बदल ज्यांना आवश्यक वाटतात त्यांच्याकडून मलिदाही खाल्ल्या जातो. नव्हेतर आम्ही आपल्यावर उपकार केलेत हा भावही यंत...

बोगसपणा मेंदूत घुसवल्या जातोय .. वाचकांनो सावध व्हा ..! काम कुणाचे? पुरस्कार कुणाला?? यंत्रणेने भावनिक न होता, ज्याचा न्याय त्याला ही भूमिका घेण्याची गरज ..!

इमेज
बोगसपणा मेंदूत घुसवल्या जातोय .. वाचकांनो सावध व्हा ..! काम कुणाचे?  पुरस्कार कुणाला?? यंत्रणेने भावनिक न होता, ज्याचा न्याय त्याला ही भूमिका घेण्याची गरज ..! (एका पुरस्काराचे छायाचित्र) सिंदखेडराजा:- इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असतांनाच दि. ३ मार्च रोजी, झी २४ तास ह्या वृत्तवाहिनीवर गणिताचा पेपर फुटल्याची बातमी आली. एवढेच नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी ह्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यातून संपूर्ण राज्यभरात कल्लोळ उठला. यंत्रणेतील एका विभागाने हे प्रकरण झाल्याचे दाखल करण्यासंदर्भात नाकारले, त्याच व्यक्तीला सन्मानित केले जावे, हा दैवदुर्विलास आज बघावयास मिळाला. त्यामुळे घाईघाईने श्रेय कुणाच्यातरी नावे करणाऱ्या वरिष्ठांनाही अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. इयत्ता दहावी तसेच बारावी परीक्षा सुरु झाल्यापासून सोशल मीडियाचा वापर करीत पेपर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन, झी २४ तासच्या प्रतिनिधीने त्या प्रकरणावर आपले लक्ष कायम केले. इयत्ता १२ वी च्या पेपरफुटीमध्ये त्यांना यशही लाभले. नव्हेतर बातमी वाऱ्यावर न जाता त्यातील ...