सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर नऊ कॉलेजेसचा निकाल १०० टक्के



सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर 

नऊ कॉलेजेसचा निकाल १०० टक्के 


सिंदखेडराजा:- तालुक्यात बारावी परीक्षेचा निकाल यंदा अत्यंत उज्ज्वल लागला असून 100 टक्के निकाल देणाऱ्या महाविद्यालयांनी अग्रस्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे मुलींनी पुन्हा एकदा सरस कामगिरी करत “बाजी मारली” आहे.
तालुक्यातील 27 कनिष्ठ व 2 तांत्रिक महाविद्यालयांचा एकूण निकाल 98.09 टक्के लागला. एकूण 3,221 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 3,196 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 3,135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 1,196 विशेष प्राविण्य, 1,454 प्रथम श्रेणी, 451 द्वितीय श्रेणी व 34 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुलींची कामगिरी विशेष ठरली.

100 टक्के निकाल देणारी अव्वल महाविद्यालये
एस. ई. एस. साखरखेर्डा, मौ. अबुल कलाम आझाद उर्दू (सिंदखेडराजा), पंडित नेहरू (मलकापूर पांग्रा), अटलबिहारी वाजपेयी (राहेरी बु.), जान्हवी (दुसरबीड), आदर्श (सिंदखेडराजा), कामक्षा देवी (किनगाव राजा), उत्कर्ष (सिंदखेडराजा), तसेच एस. ई. एस. व्यावसायिक (साखरखेर्डा) या महाविद्यालयांनी 100% निकाल नोंदवत मानाचा तुरा रोवला आहे.

उत्कृष्ट व उल्लेखनीय निकाल
जिजामाता सिंदखेडराजा (99.73%), तुकाराम कायंदे रुम्हणा (99.06%), कै. विजय मखमले मलकापूर पांग्रा (99.51%), राजीव गांधी सिंदखेडराजा (98.99%), संस्कार शेंदूरजन (98.67%), छत्रपती शाहू महाराज चिंचोली (98.83%), स्व. भास्करराव शिंगणे साखरखेर्डा (98.49%), स्वामी समर्थ जांभोरा (97.80%), यशवंतराव चव्हाण राजेगाव (97.91%), सावित्रीबाई फुले गुरुकुल (97.36%), नूतन किनगाव राजा (97.43%) यांनीही उच्च निकाल देत परंपरा कायम राखली.

इतर महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे
जीवन विकास दुसरबीड (99.39%), महात्मा जोतिबा फुले क.म.वि. सिंदखेडराजा (94.69%), नारायणराव नागरे दुसरबीड (92.53%), कै. अण्णासाहेब गायकवाड देऊळगाव कोळ (95.34%), प्रो. जावेदखान उर्दू दुसरबीड (94.31%), संजय गांधी धांदरवाडी (97.01%), वैभव जांभोरा (88.88%), जीवन विकास साठेगाव (66.66%), तसेच जीवन विकास व्यावसायिक दुसरबीड (91.66%) असा निकाल लागला.

जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालातही सिंदखेडराजा आघाडीवर
बुलढाणा जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा निकाल पाहता — बुलढाणा 97.82%, मोताळा 90.49%, चिखली 98.38%, देऊळगावराजा 98.37%, लोणार 96.87%, मेहकर 94.95%, खामगाव 94.89%, शेगाव 87.55%, नांदुरा 91.07%, मलकापूर 91.17%, जळगाव जामोद 93.07% तसेच संग्रामपूर 93.81% असा निकाल लागला आहे.
या सर्वांमध्ये सिंदखेडराजा तालुक्याने 98.09% निकालासह विशेष ठसा उमटवत जिल्ह्यात अग्रक्रम राखला आहे.

एकूणच, सिंदखेडराजा तालुक्याने यंदा बारावी निकालात भरीव यश मिळवले आहे. 100 टक्के निकाल देणाऱ्या महाविद्यालयांनी गुणवत्ता सिद्ध केली, तर मुलींच्या उज्ज्वल यशामुळे तालुक्याचा शैक्षणिक नावलौकिक अधिकच उंचावला आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हा उल्लेखनीय निकाल शक्य झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल