लाच स्वीकारतांना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबवित होते लाचेची प्रक्रिया
लाच स्वीकारतांना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबवित होते लाचेची प्रक्रिया
सिंदखेडराजा:- येथील तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह शिपाई व वाहन चालक अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चक्क तहसील कार्यालयात ३५ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले असून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज दि. १२ एप्रिल, शुक्रवारी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. तर तहसीलदार यांच्या दोन घरांच्या झाडाझडती मध्ये ४६ लाख ९२ हजार १८० रु. रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तालुक्यात इतर काही रेती व्यावसायिक चोरुन उत्खनन व वाहतूक करीत असतांनाच ह्या लाच प्रकरणातील रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तक्रारदारावर मात्र बंदी लादण्यात आली होती. त्यामुळे त्या तक्रारदाराने आपल्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने खडकपूर्णा नदीतील रेती काठावर आणणे व तेथून पुढे वाहतूक करु देणे, ह्या सगळ्या बाबींकडे महसूल विभाग व विशेषतः सिंदखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी दुर्लक्ष करण्यासाठी तसेच तक्रार आल्यास निपटवून देण्यासाठी शिपाई पंजाब ताठे व वाहन चालक मंगेश कुलथे यांच्या माध्यमातून ३५ हजार रु. प्रति महिना देण्याचे ठरवत प्रकरण मॅनेज करण्यात आले होते.
ह्याच प्रकरणी ट्रॅक्टर चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. आज दि. १२ एप्रिल, शुक्रवारी लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. तहसीलदार यांच्या सांगण्यावरुन व पंजाब ताठे याच्या लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानुसार ३५ हजार रुपयाची लाच स्वीकारीत असतांना चालक मंगेश कुलथे याला बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली असता ३७ लाख ५२ हजार १८० रु. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी यांनी त्यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली असता ९ लाख ४० हजार रु. अशी दोन्ही मिळून एकूण ४६ लाख ९२ हजार १८० रु. रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा पथकामधील पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाम भांगे, पोहेकाॅं प्रवीण बैरागी, नापोकाॅं विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकाॅं रणजीत व्यवहारे, मपोकाॅं स्वाती वाणी, चालक नापोकाॅं नितीश शेटे आदि करीत आहेत.

चिकित्सक पत्रकारिता
उत्तर द्याहटवाजन सामान्य पर्यंत माहिती पोहोचवल्या बद्दल खुप आभार ....
उत्तर द्याहटवाअतिउत्तम
उत्तर द्याहटवाआपल्या गावातील अशाच बातम्या प्रकाशित केल्यात तर योग्य होईल. साखरखेर्डा येथील बातम्या एकतर आपण प्रकाशित करत नाहीत. किंवा गुळमुळीत भाषा वापरत तथ्य बाहेर च येऊ देत नाही.
उत्तर द्याहटवा