भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल


 भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला

बहिणीची भावाला यकृत भेट

स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल


सिंदखेडराजा:- भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला एका बहिणीने आपल्या भावाला यकृतदान करीत समाजात एक स्पृहणीय आदर्श निर्माण केला आहे. 

दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा दिवस भावाबहिणीच्या नात्यातील महत्वाचा दिवस असतो. त्यानिमित्ताने भावाच्या घरी म्हणजेच माहेरी हक्काधिकाराने जाता येत असते. भाचे मंडळी सुद्धा मामाच्या घरी जाण्यासाठी आतुर असतात.

त्यामुळेच दिवाळीचा सण आला की सासुरवाशीण महिला माहेराकडे डोळे लावून आठवण काढत असतात. 

तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सौ. दुर्गा अरुण धायतडक हिचे माहेर देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा हे आहे. तिचा भाऊ हॉटेल व्यावसायिक रमेश नागरे यांची प्रकृती काही दिवसांपासून अधूनमधून खराब होत होती. त्यामुळे लहान भाऊ संतोष नागरे व कुटुंबीयांनी त्यांना  मोठमोठ्या दवाखान्यात निदान व उपचारासाठी नेले. त्यात यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. परंतु त्यामध्ये यकृत बिघाड जास्तच असल्याचे आढळले. त्यामुळे औषधोपचाराने आजार नियंत्रण साध्य होणार नाही. मात्र यकृत अवरोपण केल्यास पूर्णपणे आराम मिळेल असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. आता कुटुंब, नातेवाईक, मित्र, हितचिंतक सगळेच यकृत कोण देईल? ह्या बाबीने चिंताग्रस्त झाले. ही बाब रमेश नागरे यांची बहीण दुर्गा अरुण धायतडक यांच्या कानावर पडल्याने ती सुद्धा बहिण व्यथित व चिंताग्रस्त झाली. भाऊ जर जिवंत असला तरच मी भावासोबत दिवाळी भाऊबीज व रक्षाबंधन आदि सण साजरे करण्यासाठी भावाच्या घरी जाऊ शकेल. त्यामुळे भावाला जर आपणच यकृत दिले तर मात्र भाऊ वाचू शकतो, असा विचार तिच्या मनात पक्का झाला. तिने आपल्या मनातील ही कल्पना पतीला सांगितली. अरुण धायतडक यांनी क्षणाचाही विचार न करता, लगेच होकार दिला. धायतडक कुटुंबीयांनी लगेच मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल गाठले. तेथे सर्व तपासण्या झाल्या. त्यात भावाच्या प्रकृतीशी यकृत मॅच झाले. विनाविलंब तज्ञ डॉक्टरांनी ऑपरेशन करून दुर्गाचे यकृत भाऊ रमेश यांना प्रत्यारोपित केल्या गेले. सध्या दोघांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे

ऐन दिवाळी सणात त्यातही भाऊबीजेच्या पूर्वसंध्येलाच बहिणीने भावाला स्वतःचे यकृत देऊन भावाचा जीव वाचवल्याचा अनोखा दाखला समाजासमोर आला आहे.

भावनाप्रधान करणाऱ्या ह्या स्पृहणीय प्रसंगाची पोस्ट समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे. यातून सगळीकडे अभिनंदनीय व स्वागतयुक्त वातावरण व चर्चा आहे.

टिप्पण्या

  1. धन्यवाद ताई आपल्या दोघं बहीण भावांना दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना पांडुरंगाला करत आहे. राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी.

    उत्तर द्याहटवा
  2. ताई आपण अभिनंदनास निश्चित पात्र आहात सोबत आपले पती ज्यांनी आपणास सहकार्य केले ते सुध्दा स्पृहनीय आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद तुम्हाला दोघांना भरपूर आयुष्य लाभो हीच भगवान बाबा चर्नी प्रार्थना

    उत्तर द्याहटवा
  4. ताई आपल्याला मनापासून धन्यवाद नाहीतर आताच्या काळात बहीनी वारसाहक्काची सही करायला सुध्दा पैसे घेतात आणि भावासोबतचे नाते तोडून टाकतात

    उत्तर द्याहटवा
  5. भावपूर्ण श्रध्दांजली ताई.तू स्वतः चे प्राण गमावून भावाला जिवदान दिले आहे . तुला स्वर्गामधे चांगली जागा मिळो ही भगवान बाबा चरणी प्रार्थना.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा