एसटी बस अक्षरशः अर्धी चिरली अपघातात ६ ठार तर १६ गंभीर
कंटेनर व एसटी बसची समोरासमोर धडक
एसटी बस अक्षरशः अर्धी चिरली
अपघातात ६ ठार तर १६ गंभीर
विशेष प्रतिनिधी
सिंदखेडराजा:- तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सी वर दुसरबीड ते सिंदखेडराजा दरम्यान आज दि. २३ मे, मंगळवारी सकाळी ६.०० वा. च्या सुमारास पळसखेड चक्का फाट्याजवळ कंटेनर व बस ही दोन वाहने एकमेकांना समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला. या घटनेत कंटेनरने बसच्या चालकाची बाजू अर्ध्या भागापर्यंत अक्षरशः चिरत नेली होती. या घटनेची माहिती मिळताच किनगावराजा ठाणेदार युवराज रबडे व त्यांचे सहकारी कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व उपस्थित पळसखेड ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरु करीत, सर्व अपघात बधितांना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यावेळी ६ व्यक्ती मृत झाल्या होत्या. त्यात ३ महिला व ३ पुरुष, ज्यामध्ये दोन्हीही चालकांचा समावेश होता. तर १६ व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत होत्या. गंभीर व्यक्तींना पुढील उपचारासाठी तातडीने जालना येथे हलविण्यात आले. तर किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले.
दुर्घटनेतील बस मेहकर आगाराची रातराणी होती. पुण्याहून प्रवासी घेत मेहकर येथे परतत होती.
घटनेच्यावेळी त्यावर चालक राजू टी. कुलाल, वडगाव तेजन, हल्ली मुक्काम हिवरा आश्रम व वाहक प्रभाकर आर. मुंढे, दुसरबीड हे कर्तव्यावर होते.
मृतकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. बस चालक राजू तुकाराम कुलाल, ४२, वडगाव तेजन, ता. लोणार, ह. मु. हिवरा आश्रम, ता. मेहकर, शेषराव उत्तमराव खराबे, वय ६५, अंत्री देशमुख, ता. मेहकर, वनमाला किशोर पवार, वय ३०, बेलगाव, ता. मेहकर, सीमा सोमेश्वर जोशी, वय ५०, मेहकर, गोकर्णा रामदास खिल्लारे, वय ४५, केळवद, ता. चिखली व कंटेनर चालक (ज्यांचे नाव मिळू शकले नाही)
जालना येथे हलविण्यात आलेल्या गंभीर जखमींची नावे
राहुल भीमराव मोरे, वय ५५, अंचली, योगेश सदाशिव जुमडे, वय ३० वर्षे, सुनील वाघ, वय ४३, दुसरबीड, जीवन सुधाकर डेरे, ४२, राजेगाव, अर्चना ढाकरके, वय २०, विकास अनिल व्यवहारे, ३५, जया पाटोळे, वय ३८, श्वेता पाटोळे, वय १७, सार्थक पाटोळे, वय १७, गायत्री तहकीत, वय १५, सर्व रा. मेहकर, हर्षदा पाटोळे, वय १८, लोणार, सुनीता लव्हाळे, वय ४८, लव्हाळा, वत्सला मोहन चव्हाण, वय ४७, कोरेगाव, मंजुळा विशाल शिर्के, वय २३, पुणे, रुख्मिना वाघ, वय ५०, सिंदखेडराजा व विलास दुबे, वय ५०, हजारीबाग
किरकोळ जखमींची नावे
बस वाहक प्रभाकर मुंढे, वय ५२, प्रल्हाद देशमुख, वय, ४५, सुनील वाघ, वय ४३, वैष्णवी वाघ, वय १५, ओम वाघ, वय १० वर्षे, सर्व रा. दुसरबीड, अखिलेश ढाकरके, वय २५, लिलाबाई माने, वय ७०, अगस्त्य माने, वय ५, शीतल माने, वय १६, लिलाबाई अग्रवाल, वय ६५, सर्व रा. मेहकर, सैय्यद बीबन सैय्यद बुऱ्हान, वय ६०, सिंदखेडराजा व इतर
घटनास्थळाचे दृश्य एवढे भीषण होते की, प्रवाश्यांची लगेजेस, पादत्राणे, काही शरीरांची अवयवे इतस्ततः फेकल्या गेली होती. नव्हेतर काही मृतक व गंभीर जखमींची शरीरे एवढी छिन्नविच्छिन्न झाली होती की, त्याकडे पहावल्या जात नव्हते. तर ते बघणाऱ्या काही हळव्या व्यक्तींना जागीच भोवळ येऊन, उलट्या झाल्या.
अपघातातील काही गंभीर जखमींची अवस्था अत्यवस्थ असून, मृतकांची संख्या वाढते की काय? अशी भीतीही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.



अतिशय धक्कादायक घटना.😔
उत्तर द्याहटवा🌹🙏🌹
उत्तर द्याहटवा