मिस यु व्ही. टी. ... मानवतेचा पुजारी हरवलाय ...

 


मिस यु व्ही. टी. ...

मानवतेचा पुजारी हरवलाय ...

           दीसना✍️

एक सामाजिक प्रसंग होता. माझ्यासमोर व्हीटी होते. माझ्याकडून नवी नवी ओळख होती. बोलतांना दीपक दादा, दीपक दादा असा उच्चार सुरु होता. मी म्हटले की, तुम्ही मला दादा म्हणत जाऊ नका. तुम्ही इव्हाया जवायाचे माझ्यापेक्षा सिनिअर आहात. व्हीटींनी ताबडतोब प्रतिप्रश्न केला, तुमची रिटायरमेंट कधी? मी म्हणालो २०२४ तर, प्रत्त्युत्तरात ते म्हणाले माझी २०२६. मला काहीच बोलता येईना. त्यानंतर ह्या ना त्या कारणाने संबंध वाढत गेले. मी त्यांना माझे मामेकुळ म्हणायचो. कारण जागदरी व सावखेड तेजन येथे आमचे मामेकुळ व मामा म्हणजे जायभाये. त्यानंतर वेळोवेळी संपर्क येत गेल्याने संबंध दृढ होत गेले. काही महिन्यांपूर्वी आम्हा दोघांमध्ये लसावी, मसावीच्या स्वरुपात डॉ. शिंगणे आले. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक मैत्रीच्या नात्याची वीण आणखी घट्ट झाली. देऊळगावराजा पासून मैत्रीचे गणगोतच मोठ्ठे असल्याने मला नातेवाईक व नाती एवढी माहीत नाहीत. त्यामध्ये व्हीटींनी मला नात्यांची माहिती देऊन भर घातली. कुणाचेही काहीही काम असो, त्याने व्हीटींची भेट घेतली व समस्या सांगितली की, व्हीटी मोटारसायकलवर तालुकाच नव्हेतर जिल्हाभरात कुठेही जाणार हे ठरलेलेच. त्याच दरम्यान त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याचे कळले होते. त्यामुळे दगदग कमी करा हे मी त्यांना हक्काने म्हणायचो. हो हो म्हणत पण ऐकण्यापेक्षा लोकांच्या सुखदुःखासाठी त्यांच्या पायाला असलेला भोवरा मोटारसायकल रुपात घरघर फिरत असायचा.

आम्हा दोघांत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक प्रकारच्या चर्चा व्हायच्या. दरम्यान मागच्या रविवारी शेंदूरजन येथील लग्नासाठी बुलडाणा येथे गेलो. त्यावेळी काही कामानिमित्त पालकमंत्री डॉ. शिंगणे साहेबांकडे गेलो होतो. तेथे एका प्रकरणात तडजोड करण्यासाठी आपल्याला महिनाभरात बैठक घ्यायची असल्याबाबत व त्यामध्ये काही व्यक्तींना साहेबांनी स्वतः बोलावे, असे साहेबांना सांगितले. माझ्या व व्हीटींच्या वैचारिक चर्चेत वेळोवेळी बोलल्याप्रमाणे व्हीटींच्या स्वतःच्या मतात मला परिवर्तन अपेक्षित होते. दरवेळी प्रत्त्युत्तरात हो .. हो .. म्हणत व्हीटी विचार करायचे.

परवाच आमच्या दोघांमध्ये झालेल्या चर्चेत काही महत्वाचे निर्णय घेण्याचे ठरले होते.

पण,

ती वेळ येण्याआधीच व्हीटींनी दुनियेला टाटा, गुडबाय केल्याची वाईट बातमी आज सकाळी आली, अन काळजावर दगड ठेऊन सिंदखेडराजा, जागदरी सर्व झाले. आता हळवा झालोय ..

एक दोघांना कॉल केले.

मन शांत होत नाहीये.

व्हीटी आपण खूप घाई केलीत.

आम्ही काय करावं? कुणाकडे पाहावं??

अंतःकरण जड झालंय ..!

आपल्या संतुलन साधणाऱ्या, समजदारीच्या मायाळू चिरंतन स्मृतींना विनम्र अभिवादन ....!!🌹

वूई मिस यु व्हीटी ..!🙏

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
आतीषय मनाला चाटका लावून जानारी बातमी...
खुप मोठी हानी झाली असुन बंधू व मित्रात्वाच्या नात्यात ठाम्याठोक पाठीमागे उभा राहणारा वाघ पडद्याच्या काळाआड गेला...
बंधूसम मित्र व्ही.टी.जायभाये सर यांना भावपूर्ण श्रध्दांजली सरांना ईश्वर चरणी चांगली जागा भोटो हिच प्रार्थना..🙏🏻
💐🙏🏻💐🙏💐🙏🏻💐
Unknown म्हणाले…
V.T सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Unknown म्हणाले…
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव सरांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो💐💐💐💐
Unknown म्हणाले…
्व्हि टि च्या रुपात समाजात वावरणारा मानुसकिचा
स्त्रोत कायमचा आटला
अतिव दुखाची हानिकारक घटना घडली
व्हि टी ना भावनामय सश्रध्दांजली अर्पितो
Unknown म्हणाले…
व्हि. टि. सर भावपूर्ण श्रद्धांजली
Unknown म्हणाले…
अतिशय दुःखद घटना आहे त्यातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
Unknown म्हणाले…
भावपूर्ण श्रद्धांजली व्हीटींना !जागदरीच्या आसमंतातील एक तारा निखळला
Unknown म्हणाले…
भावपुर्ण श्रध्दांजली
Unknown म्हणाले…
व्ही.टी. सरांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण💐💐
Unknown म्हणाले…
भावपूर्ण श्रद्धांजली काका
Unknown म्हणाले…
भावपूर्ण श्रद्धांजली सराना
Unknown म्हणाले…
भावपूर्ण श्रद्धांजली व्ही.टी.सर
अजय सांगळे म्हणाले…
मामांना भावपुर्ण श्रध्दांजली ��
Unknown म्हणाले…
अतिशय दुःखद घटना मनाला चटका देवून व्ही.टी. सर आपणांस सोडून गेले---- भावपूर्ण श्रद्धांजली
Vivek kale म्हणाले…
स्वर्गीय जायभाये सर म्हणजे आमच्या परिवाराला आधार वाडा सारखे होते भेटल्यानंतर पूर्ण परिवाराची चौकशी करणे त्यात काही अडचणी असल्यास त्यावर मार्गदर्शन करणे व स्पष्टवक्तेपण हक्काने समजून सांगणे या गोष्टी सदोदित त्यांच्याकडून आमच्यासाठी होत होत्या परंतु काळाने आमच्यावर आभाळ माया असलेला एक चेहरा दूर नेला आदरणीय सरांना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली������������������
काळे परिवार मोहाडी
Vivek kale म्हणाले…
स्वर्गीय जायभाये सर म्हणजे आमच्या परिवाराला आधार वाडा सारखे होते भेटल्यानंतर पूर्ण परिवाराची चौकशी करणे त्यात काही अडचणी असल्यास त्यावर मार्गदर्शन करणे व स्पष्टवक्तेपण हक्काने समजून सांगणे या गोष्टी सदोदित त्यांच्याकडून आमच्यासाठी होत होत्या परंतु काळाने आमच्यावर आभाळ माया असलेला एक चेहरा दूर नेला आदरणीय सरांना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली👏🏻👏🏻👏🏻💐💐💐
काळे परिवार मोहाडी
Unknown म्हणाले…
जायभाये सरांना भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐
Unknown म्हणाले…
गेले १२ वर्षे झाले सर नियमित माझ्या संपर्कात होते महिन्यातील एक दिवस आमच्या साठी सर आवर्जुन द्यायचे मन मोकळ्या गप्पा मार्गदर्शन आणि सुचक वक्तव्य याच बरोबर चहा आणि केसांची छाटणी असा महिन्याला ठरलेला दिनक्रम असायचा आमची शेवटीच भेट गेल्या दहा दिवसांपूर्वी झाली तास दोन सर सोबत होते आज सरांचा फोन येइल असा भास होतोय दरवेळी सरांचा फोन यायचा "भाऊ आहात का दुकानात मी घरी आहे निघतोय आता" असा फोन दरवेळी यायचा एकमेकांच्या सुखा दुखात आम्ही सदैव होते मात्र या वेळी सरांनी न सांगता खुप मोठा धक्का दिलाय घश्या खाली घास ही गिळण कठीण आहे डोळ्यांसमोरून सरांचा हसताना बोलताना चेहरा दिसतो आणि आतुन उर भरुन येते कठीण काळ आहे भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द म्हणजे खूप मोठ ओझ झालय माझ्या दुकानातील बरेच विषय चर्चा आज ही आठवतात.. शब्द अपुरे आहेत सरांच्या आठवणींत..


बबन जाधव
सिंगार मेन्स पार्लर
Deepak Satyabhan Nagre म्हणाले…
हो,
यासंदर्भात मला एका मित्राने सांगितले आहे. त्यामुळे आपली भेट घेण्याची इच्छा आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या पार्लर मध्ये एकदा आलो होतो.
Deepak Satyabhan Nagre म्हणाले…
योगेशच्या आग्रहावरुन मृत्यूच्या बरोब्बर एक आठवडा पूर्वी आपल्या घरी आम्ही चहा घेतला होता. त्यावेळी आईची आणि व्हीटी सरांची कौटुंबिक चर्चा झाली होती.
Deepak Satyabhan Nagre म्हणाले…
फक्त जागदरीच नव्हेतर देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील धडाडीचा नेता हरवला आहे.
Deepak Satyabhan Nagre म्हणाले…
माणुसकी म्हणजे काय? ह्याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे व्हीटी सर ..
Deepak Satyabhan Nagre म्हणाले…
व्हीटी आपल्यात नाही, ही भावना मन अजिबात स्वीकारत नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!