मिस यु व्ही. टी. ... मानवतेचा पुजारी हरवलाय ...
मिस यु व्ही. टी. ...
मानवतेचा पुजारी हरवलाय ...
दीसना✍️
एक सामाजिक प्रसंग होता. माझ्यासमोर व्हीटी होते. माझ्याकडून नवी नवी ओळख होती. बोलतांना दीपक दादा, दीपक दादा असा उच्चार सुरु होता. मी म्हटले की, तुम्ही मला दादा म्हणत जाऊ नका. तुम्ही इव्हाया जवायाचे माझ्यापेक्षा सिनिअर आहात. व्हीटींनी ताबडतोब प्रतिप्रश्न केला, तुमची रिटायरमेंट कधी? मी म्हणालो २०२४ तर, प्रत्त्युत्तरात ते म्हणाले माझी २०२६. मला काहीच बोलता येईना. त्यानंतर ह्या ना त्या कारणाने संबंध वाढत गेले. मी त्यांना माझे मामेकुळ म्हणायचो. कारण जागदरी व सावखेड तेजन येथे आमचे मामेकुळ व मामा म्हणजे जायभाये. त्यानंतर वेळोवेळी संपर्क येत गेल्याने संबंध दृढ होत गेले. काही महिन्यांपूर्वी आम्हा दोघांमध्ये लसावी, मसावीच्या स्वरुपात डॉ. शिंगणे आले. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक मैत्रीच्या नात्याची वीण आणखी घट्ट झाली. देऊळगावराजा पासून मैत्रीचे गणगोतच मोठ्ठे असल्याने मला नातेवाईक व नाती एवढी माहीत नाहीत. त्यामध्ये व्हीटींनी मला नात्यांची माहिती देऊन भर घातली. कुणाचेही काहीही काम असो, त्याने व्हीटींची भेट घेतली व समस्या सांगितली की, व्हीटी मोटारसायकलवर तालुकाच नव्हेतर जिल्हाभरात कुठेही जाणार हे ठरलेलेच. त्याच दरम्यान त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याचे कळले होते. त्यामुळे दगदग कमी करा हे मी त्यांना हक्काने म्हणायचो. हो हो म्हणत पण ऐकण्यापेक्षा लोकांच्या सुखदुःखासाठी त्यांच्या पायाला असलेला भोवरा मोटारसायकल रुपात घरघर फिरत असायचा.
आम्हा दोघांत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक प्रकारच्या चर्चा व्हायच्या. दरम्यान मागच्या रविवारी शेंदूरजन येथील लग्नासाठी बुलडाणा येथे गेलो. त्यावेळी काही कामानिमित्त पालकमंत्री डॉ. शिंगणे साहेबांकडे गेलो होतो. तेथे एका प्रकरणात तडजोड करण्यासाठी आपल्याला महिनाभरात बैठक घ्यायची असल्याबाबत व त्यामध्ये काही व्यक्तींना साहेबांनी स्वतः बोलावे, असे साहेबांना सांगितले. माझ्या व व्हीटींच्या वैचारिक चर्चेत वेळोवेळी बोलल्याप्रमाणे व्हीटींच्या स्वतःच्या मतात मला परिवर्तन अपेक्षित होते. दरवेळी प्रत्त्युत्तरात हो .. हो .. म्हणत व्हीटी विचार करायचे.
परवाच आमच्या दोघांमध्ये झालेल्या चर्चेत काही महत्वाचे निर्णय घेण्याचे ठरले होते.
पण,
ती वेळ येण्याआधीच व्हीटींनी दुनियेला टाटा, गुडबाय केल्याची वाईट बातमी आज सकाळी आली, अन काळजावर दगड ठेऊन सिंदखेडराजा, जागदरी सर्व झाले. आता हळवा झालोय ..
एक दोघांना कॉल केले.
मन शांत होत नाहीये.
व्हीटी आपण खूप घाई केलीत.
आम्ही काय करावं? कुणाकडे पाहावं??
अंतःकरण जड झालंय ..!
आपल्या संतुलन साधणाऱ्या, समजदारीच्या मायाळू चिरंतन स्मृतींना विनम्र अभिवादन ....!!🌹
वूई मिस यु व्हीटी ..!🙏

टिप्पण्या
खुप मोठी हानी झाली असुन बंधू व मित्रात्वाच्या नात्यात ठाम्याठोक पाठीमागे उभा राहणारा वाघ पडद्याच्या काळाआड गेला...
बंधूसम मित्र व्ही.टी.जायभाये सर यांना भावपूर्ण श्रध्दांजली सरांना ईश्वर चरणी चांगली जागा भोटो हिच प्रार्थना..🙏🏻
💐🙏🏻💐🙏💐🙏🏻💐
स्त्रोत कायमचा आटला
अतिव दुखाची हानिकारक घटना घडली
व्हि टी ना भावनामय सश्रध्दांजली अर्पितो
काळे परिवार मोहाडी
काळे परिवार मोहाडी
बबन जाधव
सिंगार मेन्स पार्लर
यासंदर्भात मला एका मित्राने सांगितले आहे. त्यामुळे आपली भेट घेण्याची इच्छा आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या पार्लर मध्ये एकदा आलो होतो.