माजी आमदार तोताराम कायंदे यांनी कोरोना विषाणूशी दिली यशस्वी झुंज कोविड १९ ला नामोहरम करत दोन दिवसांत घरी परतणार

माजी आमदार तोताराम कायंदे यांनी कोरोना विषाणूशी दिली यशस्वी झुंज

कोविड १९ ला नामोहरम करत दोन दिवसांत घरी परतणार




 सिंदखेडराजा:- उतरत्या वयातही मन तसेच शरीर खंबीर ठेवले. योग्य प्रकारचा वैद्यकीय सल्ला, उपचार घेतले. त्याला अनुसरुन वैयक्तिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. यातून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार तोताराम कायंदे कोरोना विषाणूला नामोहरम करीत कोविड १९ रोगातून मुक्त होत येत्या दोन दिवसांत घरी परतणार असल्याची खात्रीशीर माहिती कायंदे कुटुंबियांकडून प्राप्त झाली आहे.

तोताराम कायंदे यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यात सातत्य ठेवणासाठी वेळोवेळी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वेळोवेळी भेटी देण्यात कायंदे मतदारसंघात मोजक्या राजकारण्यांपैकी एक आहेत. वयाच्या पंचाहत्तरीत टवटवीत राहून अथक परिश्रम घेत संपर्कात राहण्याचे त्यांचे कार्य नवयुवकाला लाजविण्याजोगे आहे. गेल्या मार्च पासून कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असतांना, इतर काही राजकारणी फक्त मोबाईल व सोशल मीडियावर संपर्क ठेवत असतांना, कायंदे यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात धावून जाणे सोडलेच नाही. मात्र त्याचवेळी डोळ्यात तेल घालत स्वतः सह इतरांनाही कोरोना संसर्ग होणार नाही, याची निक्षून खबरदारी त्यांनी घेतली. मार्च पासून नोव्हेंबर पर्यंत काही अपरिहार्य कारणे सोडली तर, कायंदे हे या ना त्या कारणाने सातत्याने दौऱ्यावर राहिले. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या पत्नी मुक्ताबाई व मुलगा डॉ. सुनील ह्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यानंतर गेल्या १२ नोव्हेंबर, गुरुवारी तोताराम कायंदे हे कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दि. १४ नोव्हेंबर, शनिवारी कायंदे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटल, व दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर, रविवारी सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी दि. १९ नोव्हेंबर, गुरुवारी फोर्टीस हॉस्पिटल, मुंबई येथे हलविण्यात आले. ह्या दरम्यानच्या काळात तोताराम कायंदे यांनी कोरोना विषाणूला झुंज देत पराजित केले व कोविड १९ रोगावर विजय मिळवला. त्यामुळे परवा दि. २५ नोव्हेंबर, बुधवारी कायंदे यांना आयसीयू मधून बाहेर आणण्यात आले आहे.
तोताराम कायंदे यांच्या कुटुंबात पुत्र डॉ. सुनील, सून डॉ. शिल्पा, पुतण्या डॉ. अनिल, पुतणसून डॉ. पूजा, पुतण्या डॉ. भारत, पुतणसून डॉ. तारा, नातू डॉ. योगेश, नातसून डॉ. स्वाती असे आठ डॉक्टर्स असल्याने त्यांनी वैद्यकीय दृष्टिकोनातून वेळीच हालचाली केल्या. तर प्राचार्य शिवराज कायंदे हे स्वतः पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद व मुंबई येथे सोबतच होते. 
येत्या रविवारी तोताराम कायंदे यांना इस्पितळामधून सुटी मिळणार असल्याची माहिती प्राचार्य शिवराज कायंदे यांनी 'दीसना' सोबत बोलतांना दिली. मात्र त्यानंतर माजी आमदार कायंदे यांना क्वारंटाईन राहण्याचे वैद्यकीय निर्देश असल्याने ते कुणालाही भेटू शकणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
वयाच्या ७५ व्या वर्षी तब्बल १४ दिवस कोरोना विषाणूशी यशस्वी झुंज देऊन ठणठणीत झालेल्या तोताराम कायंदे ह्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, वाणिज्य आदि सर्वच क्षेत्रात कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या

  1. अभिनंदन कायंदे साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

    उत्तर द्याहटवा
  2. आमदार बाबा आपनांस श्री संत गजानन महाराजांच्या चरणी उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो..!

    उत्तर द्याहटवा
  3. आदरणीय बाबा संत गजानन महाराज ,माता तुळजाभवणीच्या आशीर्वाद, तशेच तमाम महाराष्ट्रातील शुभचिंतांच्या प्रेम, शुभ आशीर्वाद ने आपण ही लढाई जिंकली सलाम आपणास,आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो
    आपला दत्तात्रय कायंदे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा