पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या   सिंदखेडराजा:- तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील वयोवृद्ध शेतकरी बाबुराव श्रीराम देशमुख यांनी सततची नापिकी व मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज या चिंतेपोटी स्वतःच्या शेतातील उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यासंदर्भात मृतक शेतकऱ्याचा पुतण्या अमोल संजयराव देशमुख (वय ३०) यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार बाबुराव श्रीराम देशमुख वय ६१ वर्षे, हे आज दि. २९ डिसेंबर २०२५, सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील मोटर पंप चालू करण्यासाठी गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःच्याच शेतातील उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत काहींना दिसले, त्यावरुन मिळालेल्या मोबाईल कॉल व  संदेशानुसार मी शेतात जाऊन खात्री केली असता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. माझे काका बाबुराव श्रीराम देशमुख, रा. मलकापूर पांग्रा  यांच्या...

विहीर नोंदणीचा अथवा काढण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही पूर्वापार परंपरा व ऑनलाईन नोंदणीतील बदलामुळे होतोय घोळ? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज

इमेज
  "पाठलाग बातमीचा" विहीर नोंदणीचा अथवा काढण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही  पूर्वापार परंपरा व ऑनलाईन नोंदणीतील बदलामुळे होतोय घोळ? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज   सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी):- तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील प्रल्हाद बजेबा पंजरकर या शेतकऱ्याच्या विहीरीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंद प्रकरणाच्या "दीसना" मधील दि. २७ डिसेंबर, शनिवारी प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे तालुकाभरातील शेतकरी तसेच महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. वृत्त प्रकाशित होताच आणखी काही शेतकऱ्यांच्या विहिरीची नोंद सुद्धा गायब झाली असल्याची माहिती काहींनी संपर्क साधून सांगितल्याने समोर आली आहे.  त्यातून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता, शेतकरी वर्गाला बदलांची माहिती नाही. त्यामुळे गैरसमजातून हे प्रकार घडत असल्याचेही समोर आले आहे. आज दि. २८ डिसेंबर, रोजी रविवार असल्याने संबंधित खात्याच्या अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क साधावा की नाही? याबाबत "दीसना" परिवाराच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. त्यास्तव समाजमाध्यमांवरुन संबंधितांना संदेश दिला असता, सिंदखेडराजा तहसी...

विहीर अस्तित्वात असतांनाही तलाठ्याने केली नोंद गायब शंकाकुशंकात्मक चर्चांना उधाण न्याय कधी मिळतो? याकडे लक्ष

इमेज
  विहीर अस्तित्वात असतांनाही तलाठ्याने केली नोंद गायब  शंकाकुशंकात्मक चर्चांना उधाण  न्याय कधी मिळतो? याकडे लक्ष  सिंदखेडराजा:- तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीची असलेली नोंद तलाठ्याने सातबारा उताऱ्यावरून चक्क गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याने तलाठ्यास प्रत्यक्ष भेटून, नव्हेतर तहसीलदार यांनाही निवेदन दिले. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. शेवटी आता त्या शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून, त्यावर कारवाई होते की नाही? याबाबत शेतकरी वर्गात शंकाकुशंकात्मक चर्चेला उधाण आले आहे. पिंपळगाव सोनारा येथील प्रल्हाद बजेबा पंजरकर यांची शेती गावानजीक परंतु, चिखली तालुक्यातील मेरा बु. शिवारातील गट नंबर ५९१ मध्ये आहे व शेतीचे महसूल खाते सुध्दा मेरा बु. च्या रेकॉर्ड मध्ये आहे. त्याच शेतामध्ये पूर्वापार विहीर आहे. त्याची नोंद सुध्दा महसूल दप्तरात होती. परंतु 'आले तलाठ्यांच्या मना तेथे कुणाचेही चालेना' या उक्तीनुसार कुठलीही सूचना न देता, पंचनामा न करता, अगदीच बेकायदेशीरपणे तलाठ्याने त्या विहीरीची नोंदच सातबारा उ...

CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इमेज
 CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना,  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सिंदखेडराजा:- तालुक्यातील एका गावात दोन अल्पवयीन मुलांनी एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी दि. २४ डिसेंबर रोजी तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. संस्कार, सामाजिक जाणीव आणि बालसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. “इतक्या लहान वयात अशी विकृती कशी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलीच्या ३५ वर्षीय आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तालुक्यातील एका गावात, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शेजारी हे कुटुंब वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजता ११ वर्षीय मुलगी घरात एकटी झाडझुड करीत असताना, शेजारी राहणारे अंदाजे १४ व १५ वर्षे वयाचे दोन अल्पवयीन मुलगे तिच्या घरी आले. यावेळी १४ वर्षीय मुलाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला,...

अनपेक्षितपणे डॉ. शिंगणे यांचा उमेदवार सौरभ तायडे विजयी: प्रस्थापितांना अक्षरशः लोळविले तर देऊळगावराजात माधुरी शिपणेने लावला झेंडा

इमेज
  अनपेक्षितपणे डॉ. शिंगणे यांचा उमेदवार सौरभ तायडे विजयी: प्रस्थापितांना अक्षरशः लोळविले तर देऊळगावराजात माधुरी शिपणेने लावला झेंडा सिंदखेडराजा:-  येथील पालिका निवडणुकीत माजी मंत्री डॉ. शिंगणे यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ तायडे यांनी बड्याबड्या उमेदवारांना अक्षरशः लोळवत एकहाती विजय मिळविला आहे. ह्या नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. तर राजकीय क्षेत्रातील अनपेक्षित निकालामुळे मतदारसंघातील  राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत सौरभ विजय तायडे यांना ४२८७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार शाम किसनराव मेहेत्रे यांना ४११८ मते मिळाली. शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार अतिष बाळाजी तायडे यांना ३४६३ मते मिळाली.याशिवाय बहुजन समाज पार्टीचे रंगनाथ आसाराम खाटीकमारे यांना १२९,अपक्ष दिलीप भिकाजी चौधरी यांना १५८,अपक्ष ॲड. सैय्यद मुबीन सैय्यद नईम यांना ४६ मते मिळाली असून नोटा ४६ मते पडले आहे. विजयी नगरसेवक व त्यांना पडलेले मतदान पुढील प्रमाणे आहेत.प्रभाग १ श्रेया उमेश खरात - राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) - ६४९, संतोष ...

देऊळगावराजा शहरातील ७१.६७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क प्रभाग क्र. १०(२) पिंपळनेर मध्ये सर्वाधिक ८७.२३ टक्के मतदान

इमेज
  देऊळगावराजा शहरातील ७१.६७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क  प्रभाग क्र. १०(२) पिंपळनेर मध्ये सर्वाधिक ८७.२३ टक्के मतदान  देऊळगावराजा:- नगरपालिका निवडणुकीसाठी येथे काल दि. २० डिसेंबर, शनिवारी मतदान झाले. मात्र काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती. त्यामुळे  त्यानंतर सर्व बूथ वरील मतदानाची संख्या घेऊन, त्याची सांख्यिकी करण्यास वेळ लागल्याने, एकूण एक मतदानसंख्या व टक्केवारी रात्री अगदीच उशीरा हाती आली आहे. शहरातील झालेल्या मतदानात एकूण ७१.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहरातील एकूण मतदार २९ हजार ३२६ त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ८८५ तर महिला मतदारांची संख्या १४ हजार ४४१ एवढी आहे. त्यापैकी १० हजार ९०६ पुरुष व १० हजार १११ महिलांनी अशा एकूण २१ हजार १७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच झालेल्या मतदानाची टक्केवारी ७१.६७ एवढी आहे. प्रभागनिहाय मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्र. १(१) मध्ये ७४ टक्के, क्र. १(२) मध्ये ७९.०५ टक्के व क्र. १(३) मध्ये ७०.१० टक्के  प्रभाग क्र. २(१) मध्ये ६६.६० टक्के, क्र. २(२...

तूर पिकामध्ये गांजाची लागवड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांवर संशयाच्या चर्चा

इमेज
तूर पिकामध्ये गांजाची लागवड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त   पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांवर संशयाच्या चर्चा सिंदखेडराजा:-  तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून अंमली पदार्थ असलेल्या गांजाची तुरीच्या पिकातील लागवड मोडीत काढली आहे. ८१.६२ किलोग्रॅम वजनाची व साडेबारा लाखांचा ओल्या व सुक्या गांजाचा मुद्देमाल जप्त करीत, आरोपी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर यासंदर्भात मलकापूर पांग्रा येथील पोलिस चौकी संदर्भात संशयास्पद चर्चांनी वेग घेतला आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मलकापूर पांग्रा शिवारात आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड, वय ६५ वर्षे ह्या शेतकऱ्याने गट नंबर ५०६ मधील शेतात तूर पिकासोबतच गांजाची लागवड केलेली आहे. अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना मिळाली. आपल्या कर्मचाऱ्यांना गुप्तपणे पाठवून स्थानिक गुन्हे शाखेने खातरजमा केली. त्यावरुन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तयारी ...

मुंबईसह राज्यातील एकूण २९ मनपांचे मतदान १५ जानेवारीला तर १६ जानेवारीला मतमोजणी

इमेज
 मुंबईसह राज्यातील एकूण २९ मनपांचे मतदान १५ जानेवारीला तर १६ जानेवारीला मतमोजणी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा केली आहे.  त्यामध्ये १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.  आजच्या या घोषणेसह सर्वच महानगरपालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.👇 २० ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी दाखल करणे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २ जानेवारी २०२६ उमेदवारी मागे घेण्याची मुदत  ३ जानेवारी २०२६ निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी  १५ जानेवारी २०२६ मतदान  तर १६ जानेवारी २०२६ २९ महापालिकांमध्ये एकूण २८६९ जागा आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.  यामध्ये १४४२ महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या ३४१, एसटीच्या ७७ तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील ७५९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.