जेईई मेन परीक्षेत महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलानं गाजवलं मैदान ..

जेईई मेन परिक्षेत सुशांत सिंग राजपूत ठरला होता अव्वल त्याच परिक्षेत महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलानं गाजवलं मैदान ..



सर्वांचा लाडका आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या सुशांत सिंग राजपूतने २००३ मध्ये AEEE म्हणजेच आत्ताची JEE Main परीक्षा उत्तीर्ण केली होती. अभिनयासोबतच तल्लख बुद्धिमत्ता अशी विशेष ओळख असणाऱ्या सुशांतने ऑल इंडिया रँक ७ मिळवून ही कठीण परीक्षा पास झाला होता. अशीच एक कमाल महाराष्ट्राला शेतकरी घरातील मुलाने केली आहे. त्याची प्रेरणादायी यशोगाथा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रातील एका छोटय़ाशा गावात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांसमोर आदर्श ठेवला आहे.

जेईई मेन २०२४ परीक्षेचे निकाल लागले असून, परीक्षेतील टॉपर्सची यादीही जाहीर केली आहे. यावर्षी ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, तर एआयर (ऑल इंडिया रँक) १ नीलकृष्ण निर्मलकुमार गजरे (Gajare Nilkrishna Nirmalkumar) याला देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका छोटय़ाशा गावातून आलेल्या नीलकृष्णाची कथा ही अभ्यासाप्रती असलेल्या समर्पण, मेहनत आणि चिकाटीची गोष्ट आहे. नीलकृष्णाचे वडील निर्मल कुमार हे शेतकरी आहेत आणि आई योगिता गृहिणी आहेत. नीलचे सुरुवातीचे दिवस आणि बालपण महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बेलखेडम या गावात गेले.
       IIT मध्ये प्रवेश घेण्याचे लक्ष्य
नीलकृष्ण याने महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बेलखेड या गावात चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर तो कांजलतांडा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गेला. जेईई मेनद्वारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेण्याचे लक्ष्य घेऊन, नीलने पुढे इयत्ता ११ आणि १२ वीच्या दरम्यान कोचिंगमध्ये गेला आणि भरपूर मेहनत केली.
नीलचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे नीलसाठी हा प्रवास खरंच सोपा नव्हता. मात्र, नीलला ७५ टक्के शिष्यवृत्ती मिळवण्यात यश आले होते. "माझ्या पालकांनी माझ्या शिक्षणासाठी त्यांच्या अनेक गरजांचा त्याग करून मला नेहमीच शिक्षणासाठी प्रेरित केले. मला परीक्षेत कमी गुण मिळाले तरीही त्यांनी मला पुढे जाण्याचे धैर्य दिले आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यासाठी सतत पाठिंबा दिला.” असे नील आवर्जून सांगतो. (थॅन्क्स मटा )

टिप्पण्या

निनावी म्हणाले…
घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
निनावी म्हणाले…
अभिनंदन..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!