बारावी परीक्षेत सिंदखेडराजा तालुका ९५ टक्के पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के उत्तीर्ण
सिंदखेडराजा तालुका : बारावीचा निकाल ९५ टक्के
पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के उत्तीर्ण
तर विज्ञान विषयांत पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के
सिंदखेडराजा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात तालुक्यात असलेल्या एकूण ३० कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल एकूण ९५.०७ टक्के एवढा लागला आहे. यामध्ये संजय गांधी, धांदरवाडी, अटलबिहारी वाजपेयी, राहेरी, जान्हवी, दुसरबीड, आदर्श, सिंदखेडराजा व उत्कर्ष, सिंदखेडराजा ह्या पाच कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण ३ हजार ८६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ हजार ६४ विद्यार्थ्यी परीक्षेला सामोरे गेले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार यापैकी एकूण २९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, १३२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २१४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
जिजामाता क. म. वि. सिंदखेडराजा, ३०६ पैकी ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण, टक्केवारी ९८.६९, एस. ई. एस. क. म. वि. साखरखेर्डा २३४ पैकी २२८ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९७.४३, जीवन विकास क. म. वि. दुसरबीड २३४ पैकी २२८ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९७.४३, नूतन क. म. वि. किनगाव राजा १७१ पैकी १५९ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९२.९८, म. जोतिबा फुले क. म. वि. सिंदखेडराजा ७३ पैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९०.४१, नारायणराव नागरे क. म. वि. दुसरबीड १०९ पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ८८.९९, कै. अण्णासाहेब गायकवाड क. म. वि. देऊळगाव कोळ ३१ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ६१.२९, मौ. अबुल कलाम आझाद उर्दू क. म. वि. सिंदखेडराजा ३२ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ८९.६५, यशवंतराव चव्हाण क. म. वि. राजेगाव ११९ पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ८५.७१, तुकाराम कायंदे क. म. वि. रुम्हणा २३१ पैकी २२३ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९६.५१, जीवन विकास क. म. वि. साठेगाव ३१ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ८०.६४, प्रो. जावेदखान उर्दू क. म. वि. दुसरबीड ९४ पैकी ८९ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९४.८८, स्वामी समर्थ क. म. वि. जांभोरा १६५ पैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९६.९६, संजय गांधी क. म. वि. धांदरवाडी ९६ पैकी ९६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी १००, कै. विजय मखमले क. म. वि. मलकापूर पांग्रा १५७ पैकी १५६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९९.३६, स्व. भास्करराव शिंगणे क. म. वि. साखरखेर्डा १२४ पैकी ११२ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९०.३२, पंडित नेहरु क. म. वि. मलकापूर पांग्रा १३२ पैकी १२६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९५.४५, वैभव क. म. वि. जांभोरा ४४ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ८६.३६, संस्कार क. म. वि. शेंदूरजन १५१ पैकी १४३ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९४.७०, राजीव गांधी क. म. वि. सिंदखेडराजा १५५ पैकी १५० विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९६.७७, अटलबिहारी वाजपेयी क. म. वि. राहेरी बु. ०६ पैकी ०६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी १००, ख्वाजा गरीब नवाज क. म. वि. साखरखेर्डा ५४ पैकी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९६.२९, जान्हवी क. म. वि. दुसरबीड ०८ पैकी ०८ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी १००, आदर्श क. म. वि. सिंदखेडराजा २६ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी १००, छत्रपती शाहू महाराज क. म. वि. चिंचोली ७९ पैकी ७६ उत्तीर्ण टक्केवारी ९६.२०, कामक्षादेवी क. म. वि. किनगावराजा ५९ पैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९६.६१, सावित्रीबाई फुले क. म. वि. सिंदखेडराजा ३५ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९७.१४, अंबादास दराडे क. म. वि. हिवरखेड ४ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ७५, उत्कर्ष क. म. वि. सिंदखेडराजा ४० पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी १०० तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या एस. ई. एस. व्यावसायिक क. म. वि. साखरखेर्डा १६ पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी १०० जीवन विकास व्यावसायिक क. म. वि. दुसरबीड ५१ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी ९८.०३ एवढी आहे.
यामध्ये एस. ई. एस. साखरखेर्डा मध्ये वाणिज्य व व्यावसायिक शिक्षण विषयांचा व जीवन विकास, दुसरबीड, विजय मखमले, मलकापूर पांग्रा, राजीव गांधी, सिंदखेडराजा, कामक्षादेवी, किनगावराजा व अंबादास दराडे, हिवरखेड मधील विज्ञान विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.



हार्दिक अभिनंदन !
उत्तर द्याहटवारीतील रविन्द्र अभोरे
उत्तर द्याहटवा