आज ३ मे, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन


 आज ३ मे,

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन


जगभरात दरवर्षी ३ मे ह्या दिवशी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day) साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसाची संकल्पना वेगवेगळी असते. संयुक्त राष्ट्र संघाने ३ मे हा दिवस World Press Freedom Day म्हणून साजरा केला जावा असे जाहीर केले. तेव्हापासून गेली अनेक वर्षे हा दिवस साजरा केला जातो. पत्रकारिता, पत्रकारितेचे महत्त्व आणि त्याबाबतची जनमानसात जागृकता निर्माण करणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. तसेच, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे याबाबत जगभरातील देशांतील प्रत्येक सरकारला आठवण करुन देणे हा प्रमुख उद्देश हा दिवस साजार करण्यामागे आहे. प्रसारमाध्यमांचे स्वतंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकारने पत्रकारांना संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. सरकारला त्याबाबतची जाणीव करुन देणे हे हा दिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

डिक्लेरेशन ऑफ विंडहोक

संपूर्ण जगामध्ये १९९१ मध्ये पहिल्यांदा अफ्रीका देशातील पत्रकारांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली. त्यांनी ३ मे हा दिवस World Press Freedom Day (जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन ) म्हणून साजरा केला जावा याबाबत जाहीर मागणी केली. ही मागणी डिक्लेरेशन ऑफ विंडहोक (Declaration of Windhoek) नावाने ओळखली गेली. या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने पहिल्यांदाच जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे आयोजन केले. तेंव्हापासून ३ मे हा दिवस प्रतिवर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.

का साजरा केला जातो जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन ?

जगभरातील देश हे पत्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर अत्याचार करतात. प्रसारमाध्यमे जर सरकारच्या मर्जीनुसार चालत नसतील तर तो समूह आणि त्यातील व्यक्तींना विविध पद्धतीने अडचणींत आणले जाते. त्रास दिला जातो. त्यासाठी विविध आरोप, आर्थिक संकटात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. त्या समूहाची विश्वासार्हता संपवण्यासाठी विविध कारणांसाठी दंड, आयकर छापे, जाहिरातदारांवर अप्रत्यक्ष निर्बंध असे प्रकार अवलंबले जातात. तसेच, समुहाच्या संपादक, प्रकाशक आणि पत्रकारांना सतत भीती दाखवली जाते, धमक्या दिल्या जातात. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्व मार्ग कसे बंद होतील यासाठी गळचेपी केली जाते. हे प्रकार म्हणजे लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्याच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता जगभरात जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन जगभरात साजरा केला जातो.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा