पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश राहेरी पुलाच्या पुनर्वसनासाठी नितीन गडकरी यांनी केला ९ कोटी ८५ लाख रु. निधी मंजूर

 पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश

राहेरी पुलाच्या पुनर्वसनासाठी नितीन गडकरी यांनी केला ९ कोटी ८५ लाख रु. निधी मंजूर

सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी) नागपूर ते मुंबई महामार्गावरील तालुक्यातील राहेरी नजीकच्या पुलाच्या पुनर्वसनासाठी स्थानिक आमदार तथा पालकमंत्री यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुलाच्या पुनर्वसनासाठी ९ कोटी ८५ लाख रु. निधी मंजूर केला आहे.

यासंदर्भात नितीन गडकरी यांनी डॉ. शिंगणे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहेरी पूल नादुरुस्त असल्याने त्याचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे तसेच जड वाहतूक बंद करण्यात आल्याचे आपल्याकडून कळले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आपणाला कळविण्यात आनंद होतो की, आपल्या मतदारसंघातील ह्या पुलाच्या पुनर्वसनासाठी तसेच  वळण मार्ग तयार करण्यासाठी ९ कोटी ८५ लाख रु. मंजूर करण्यात येत आहेत.

याचवेळी बुलडाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी भूमी अधिग्रहण तसेच इतर बाबींसाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घडवून आणाव्यात. जेणेकरून जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग कामे जलद गतीने पूर्णत्वास जातील व जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

टिप्पण्या

  1. बातमी मधे पुलाच्या डिझाईन बद्दल माहिती हवी होती, आता नविन पुल हा किमान चार पदरी व्हावा, तसेच पाणी अडविण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा हवी, बाकी हा पुल खुप अगोदरच तयार व्हायला हवा होता,पण आता होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे

    उत्तर द्याहटवा
  2. निधी देण्यात आला एवढेच पत्रात नमूद केलेले आहे. त्याअगोदर राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने एस्टीमेट दिलेच असेल ना?
    एवढा निधी देण्याआधी प्लॅन, एस्टीमेट वगैरे तांत्रिक औपचारिकता पूर्ण केल्याच असतील की ..!
    असे कसे एवढा निधी देतील ..

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तर भारतातील , गुजरात मध्ये बरेच नवीन पुल करताना पाणी अडविण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे,तो अंतर्भाव दिसत नाही

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा