साखरखेर्डा परिसर ठरत आहे कोरोना हॉटस्पॉट १२८ व्यक्ती आढळल्या कोरोना पॉझिटिव्ह
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
साखरखेर्डा परिसर ठरत आहे कोरोना हॉटस्पॉट
१२८ व्यक्ती आढळल्या कोरोना पॉझिटिव्ह
सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा व परिसरात असलेल्या गावांमधील व्यक्तींच्या गेल्या पाच दिवसांत केलेल्या कोरोना चाचण्यांपैकी १२८ व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. त्यामुळे साखरखेर्डा परिसर हॉटस्पॉट ठरत आहे. तर याचवेळी संचारबंदी असतांनाही ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा शिरकाव तसेच संचारबंदी संदर्भात नुसता मीडियावर कोरडा गवगवा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष कार्यातील फोलपणा ठळकपणे अधोरेखित झाला आहे.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत इच्छुकांच्या कोरोना चाचण्या नित्याने घेण्यात येत असतात. गेल्या पाच दिवसांत साखरखेर्डा व परिसरातील गावांतील जनतेच्या कोरोना करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी ११२ व्यक्तींच्या आरटीपीसीआर तर १६ रॅपिड अशा एकूण १२८ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये साखरखेर्डा येथील ६० च्या वर तर सायाळा येथील २४ व्यक्ती व उर्वरित पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये शेंदूरजन, दरेगाव, गुंज, सिंदी, सवडद, बाळसमुद्र, तांदुळवाडी येथील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुसे यांनी दिली आहे.
यामुळे संचारबंदी असतांनाही कोरोना विषाणूने ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याचे तसेच हा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे संचारबंदीचा अंगीकार करावा. अत्यावश्यक काम असले तर निक्षून काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन डॉ. संदीप सुरुसे यांनी केले आहे.
संबंधित समित्या कार्यान्वित करण्याची गरज
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये पंचायत, महसूल, कृषी, पोलीस आदिं यंत्रणेच्या प्रातिनिधिक समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याकाळात कमी अधिक स्वरुपात त्यांनी कामही व्यवस्थित पार पाडले होते. यावेळी मात्र त्या समित्या कुठेही आढळून येत नाहीत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, जनतेला स्वयंशिस्त लागावी म्हणून समित्या प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

खुप छान बातम्या आहेत
उत्तर द्याहटवा✍️👌👌
हटवा🌹🙏
हटवाGood 👍
उत्तर द्याहटवा