आज दिसणार .. सुपर पिंक मून म्हणजेच उत्कृष्ट गुलाबी चंद्र ..!
आज दिसणार ..
सुपर पिंक मून
म्हणजेच
उत्कृष्ट गुलाबी चंद्र ..!
दी.स.ना.✍️
एप्रिल महिन्यात जी पौर्णिमा येते त्या रात्रीच्या चंद्राला सुपर पिंक मून म्हणण्याची अमेरिकेतील परंपरा आहे. याला स्प्राऊटिंग ग्रास मून, एग मून, पासकल मून आणि फिश मून आदि नावांनीही संबोधतात, म्हणूनच ह्या पौर्णिमेला चंद्र प्रत्यक्षात पिंक म्हणजे गुलाबी, किंवा मासोळी इ. सारखा अंड्यासारखा दिसेल असे काही नसते.
पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र हा पृथ्वी भोवती नित्य परिभ्रमण करतो. त्याची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे चंद्र व पृथ्वी यामधील अंतर स्थळनिहाय कमी - जास्त होत असते. एप्रिल महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर खूप कमी म्हणजेच ३ लाख ८४ हजार ४०३ किलोमीटर ऐवजी ३ लाख ५६ हजार ९०७ किलोमीटर २७ हजार ४९६ किलोमीटरने कमी होते. यामुळे चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने तुलनेने अधिक मोठा व स्पष्टपणे दिसत असल्याने त्याचे सौंदर्य खुलल्याचे आढळून येते. ही पूर्णपणे खगोलीय घटना असल्याने शुभ - अशुभ, शकुन - अपशकुन इत्यादि मानू नये.🙏

टिप्पण्या
सुपर पिंक मून
म्हणजेच
उत्कृष्ट गुलाबी चंद्र ..!
सुदर