वाढदिवस पत्रकारितेतील एका मोकळ्या ढाकळ्या स्वच्छंद व्यक्तिमत्वाचा ... आज संकल्प करु या व सामील होऊ या निखळ नितळ प्रवासात

 वाढदिवस पत्रकारितेतील एका मोकळ्या ढाकळ्या स्वच्छंद व्यक्तिमत्वाचा ..

आज संकल्प करु या व सामील होऊ या निखळ नितळ प्रवासात ....



सिंदखेडराजा:- वाढदिवस म्हटलं की, जगण्याचा काळ एक वर्षाने कमी होतोय याची जाणीव देणारा दिवस असतो. मात्र त्यालाही काही ना काही निमित्त लावत विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून सकारात्मक दृष्टिकोन देणारी परंपरा मानवाने जोपासली आहे. आज दि. २३ डिसेंबर, बुधवारी असाच एक आगळा वेगळा वाढदिवस केवळ राज्यच नव्हेतर राष्ट्रव्यापी स्वरूपात समाज माध्यमावर साजरा करण्यात आला.

ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, ती व्यक्ती म्हणजे पत्रकारितेत राब राब राबून नंतर ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेची उभारणी करणारे साधी राहणी व उच्च विचारसरणीचे जिवंत उदाहरण असलेले यासिन पटेल.

त्यांचं जीवन कोकणात पत्रकारिता करण्यात व त्यानंतर संघटनेची उभारणी करण्यात, त्यासाठी अजूनही कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला सामोरे जाण्याची ह्या व्यक्तीची तयारी दिसून येते.

आपल्या प्रेमळ स्वभावाने, संघटन कौशल्याने माणसे जोडणाऱ्या ह्या अवलियाने आपला सर्व चांगुलपणा पणाला लावला. परंतु त्या चांगुलपणाचे गैरफायदा घेणारेही काही भेटले. संघटनेत घुसले व नंतर पुन्हा वेगळ्या मार्गाला लागले. परंतु, चांगल्याच्या विरोधात जाणारांची जी गत होते, तशीच गत त्या लोकांची झाली. एवढे होऊनही यासिन पटेल कधीही टस की मस झाले नाही. शांत, संयमी व स्थितप्रज्ञ असलेल्या ह्या अवलिया यासिन पटेल यांनी कोणत्याही प्रसंगात आपल्या डोक्यावर बर्फाची लादी व तोंडात खडीसाखर ही भूमिका कधीच बदलली नाही. कुणी स्तुती केली तर हुरळून जायचे नाही, अन कुणी कितीही निंदानालस्ती केली तरी हतप्रभ व्हायचे नाही, असा आपला प्रवास ह्या अवलीयाने सुरुच ठेवला आहे.

त्यामुळेच राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या पत्रकारांशी नातं निर्माण झालं. त्यातून मोठ्ठं संघटन निर्माण झालं नव्हेतर त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

कुठे कोणत्या व्यक्तींमध्ये संघटन क्षमता आहे, याची नोंद घेऊन त्या व्यक्तीला त्याच्या योग्यतेची कामगिरी द्यायची, ह्याचा निर्णय घेतांना प्रसंगी जवळच्या व्यक्तीशीही तडजोड करायची नाही. तर जबाबदारी देऊन मोकळे व्हायचे हा उपजत स्वभाव. मात्र यातही कधी कधी काहींनी विश्वासघात केला. त्यांना तेथेच सोडून देऊन आपला प्रवास सुरुच ठेवला आहे.

ह्या प्रवासात आज वाढदिवस नावाचा एक टप्पा आलाय, त्या टप्प्यावर पोहोचल्यावर पुन्हा एकदा गेल्या काळातील वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व संघटनेच्या अशा प्रत्येक स्तरावर यासिन भाई नक्कीच सिंहावलोकनात्मक दृष्टिक्षेप टाकतील ही आशा बाळगू या व यासिन भाईंच्या संघटनेतून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत ह्या प्रवाहात सामील होऊ या ..!

आजच्या या निमित्ताने एवढेच .....!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा