शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी संवेदनशील राहींची प्रसंगाशी भावलेली तद्रूपता ..
शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी संवेदनशील राहींची प्रसंगाशी भावलेली तद्रूपता ..
दीसना ✍️
सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा:- काश्मीर मधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असतांना दि. १५ डिसेंबर रोजी हिमकडा कोसळून शहीद झालेल्या प्रदीप साहेबराव मांदळे ह्या वीर जवानाच्या पार्थिवावर रविवार दि. २० डिसेंबरला तालुक्यातील पळसखेड चक्का ह्या त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यावेळी निर्माण झालेल्या कारुण्य व वीर रसाच्या संमिश्र तसेच वेगळ्याच भावनाप्रधान वातावरणात आपल्या निवेदन शैलीतून प्रख्यात साहित्यिक व संवेदनशील कवी असलेल्या अजीम नवाज राही यांनी उपस्थितांना वेगळ्याच अशा गंभीर व वीरतेच्या विश्वात नेले.
आपल्या जीवनात अगदी जगण्याच्या भ्रांतीपासून तर आज स्थिरस्थावर होण्यापर्यंत अजीम नवाज राही ह्यांनी हसत हसत प्रत्येक प्रसंगात संघर्षाचा अनुभव घेतलेला असल्याचे त्यांना जवळून ओळखणारे जाणून आहेत. हे सर्व होत एक एक टप्पा मागे पडत असतांनाही प्रत्येकवेळी त्यांच्यातला साहित्यिक जागरूक राहिला. त्यातून साहित्यात रूढ असलेले अनेक रस, भावभावनांची मांदियाळी राहींनी आपल्या जीवनात अनुभवलेली आहे. त्यातून संवेदनशील कवी व पोक्त साहित्यिक घडत गेला. विविध प्रसंगी निवेदन करीत करीत स्वतःची अशी वेगळी शैली त्यांनी निर्माण केली आहे. ही निवेदन शैली एवढी प्रभावी आहे की, ज्या निवेदकाने ती ऐकली त्याच्यावर तिचा परिणाम झाल्याचे दिसून येते. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक निवेदक कुठेतरी राहींच्या निवेदन शैलीतून व्यक्त होत असल्याचा अनुभवही मधून मधून येत असतो.
पळसखेड चक्का येथे अंत्यसंस्कारस्थळी जात असतांनाच राहींचा धीरगंभीर आवाज कानावर आला. ते ऐकतच वाट काढत त्यास्थळी पोहोचलो. तब्बल चार तास आपल्या निवेदन शैलीतून शहीद प्रदीप मांदळे ह्यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. त्याचवेळी अंत्यसंस्काराच्या विविध टप्प्यावर वीररस, करुणरस, भावभावनांचा निर्माण झालेला कल्लोळ आपल्या निवेदनातून राहींनी समोर मांडला. त्यातून उपस्थितांपैकी अनेकजण भावनाविवश व अंतर्मुख होऊन असल्या ठिकाणी शांत बसले. त्यामुळे कुठेतरी शिस्तही पाळल्या गेली.
राहींच्या निवेदन शैलीवर माझ्यासारख्या पामराला जसे सुचेल तसे लिहिले. आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.

राही यांना अमोघ वक्तृत्वाची ईश्वरी/अल्लाहची देणगी आहे
उत्तर द्याहटवाजिल्ह्यासाठी आणी आपल्या गावासाठी राही एक भूषण आहेत
आपले शब्दांकन सामर्पक आहे
राही साहेबांच आम्हाला सार्थ अभिमान आहे.
उत्तर द्याहटवा