शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थितांनी अनुभवले डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांचे पालकत्व

 शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थितांनी अनुभवले डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांचे पालकत्व




सिंदखेडराजा:- काश्मीर मधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असतांना दि. १५ डिसेंबर रोजी हिमकडा कोसळून शहीद झालेल्या प्रदीप साहेबराव मांदळे ह्या वीर जवानाच्या पार्थिवावर रविवार दि. २० डिसेंबरला तालुक्यातील पळसखेड चक्का ह्या त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यावेळी निर्माण झालेल्या कारुण्य व वीर रसाच्या वेगळ्याच भावनाप्रधान वातावरणात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांनी मांदळे कुटुंबीयांचे सांत्वन करण्याची पालकत्वाची भूमिका अनेकांच्या मनात वेगळेच चित्र निर्माण करुन गेली.
प्रदीप मांदळे ह्यांचे पार्थिव पळसखेड येथील अंत्यसंस्कार स्थळी पोहोचल्यावर पत्नी कांचन, मुलगा जयदीप, वय ५ वर्षे, सार्थक, वय २ वर्षे, आई शिवनंदा, कृषी सहाय्यक असलेला भाऊ संदीप व दुसरा भाऊ विशाल आदि मांदळे कुटुंबीय विरहाच्या वेदनेने व्याकुळ झाले होते. त्याचवेळी तेथे लष्कर, पोलीस, महसूल, पत्रकारिता, सामाजिक आदि क्षेत्रातील मंडळी आपापल्या कामात होती. त्याचवेळी शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या पत्नी कांचन व आई शिवनंदा ह्या विरहाने व्याकुळ होऊन हंबरडा फोडत होत्या. त्या भावनात्मक प्रसंगात त्यांना सावरण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे समोर आले तेंव्हा तर विरहाने व्याकुळ होण्याचा प्रसंग अगदी टोकाला पोहोचला. मात्र त्यापरिस्थितीतही डॉ. शिंगणे ह्यांनी ममत्वाने त्यांचे सांत्वन केले. 
शेकडोजण हा प्रसंग पाहून विरहाचा व त्यातून सावरण्यासाठी केलेल्या डॉ. शिंगणे ह्यांच्या प्रसंगावधनाचा अनुभव घेत होते व भावनाप्रधान प्रसंगाचे साक्षीदार झाले होते. त्यावेळी आजूबाजूचे स्त्री पुरुष अगदी स्तब्ध झाल्याची अनुभूती उपस्थितांनी घेतली. 
त्यानंतर सैनिक व पोलीस दलाची सलामी तसेच भदंत यांच्या बौद्ध धम्म संस्कार कार्यक्रमाला सुरुवात झाल्याने शोकाकुल वातावरण निवळण्यास अवधी मिळाला. त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा