काय व्हावं मतदारसंघाचं ? राजकीय क्षेत्राची शैक्षणिक क्षेत्रात घुसखोरी ..प्रभारी गटशिक्षणाधिकारी ठरताहेत वादग्रस्त


राजकारण घुसलंय शाळेत..

 गटशिक्षणाधिकारी प्रभारीपद ठरत‌ आहे वादग्रस्त  ..




सिंदखेडराजा:- तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पद हे प्रभारी म्हणून कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रातील कामकाज व्यवस्थितपणे सुरु होते‌. तरीही शैक्षणिक क्षेत्रातील एका दादाच्या माध्यमातून व सत्ताधारी एका माजी आमदार पातळीवरील पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून नुकत्याच आलेल्या प्रभारीने आपला जालीम मोर्चा व स्वतः दामाजीपंताचे कार्य हाती घेतले असल्याचे निदर्शनास येत आहे.


सिंदखेडराजा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पद हे रिकामे असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील जेष्ठ असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कार्यरत होते. सगळं काही सुरळीत चालू होते. मात्र देऊळगावराजा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका दादा प्रभारीने राजकीय माजीला हाताशी धरले. दामाजीपंतांचे तसेच मताधिक्याचे आमिष दाखवून व आपल्या अंतर्गत कार्यरत असलेल्या एका प्याद्याला पुढे केले. यामागे विद्यमान लोकप्रतिनिधीने नाथांचे गाव सांगूनही पूर्वी आपले ऐकले नव्हते, मग तर मला आता रक्कम व अधिकाराचा वापर करायचाच, असे गृहीत धरुन शैक्षणिक क्षेत्रात यादवी माजवायची व त्याद्वारे विद्यमानाचे मतातून खच्चीकरण करण्याचा कुटील डाव खेळण्याचे ठरवले असल्याचे कळते. यासाठी सर्व देवाण घेवाण ठरविण्यात आली. ती व्यवस्थितपणे झाल्यावर व संबंधित वरच्या लोकांचेही भले करीत त्या प्याद्याची सिंदखेडराजा तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदी नवीन नियुक्ती करण्यात आली. यातून बाहेरुन येऊन धूमकेतू सदृश्य परिस्थितीत निर्माण झाली व नवीन गटशिक्षणाधिकारी येथे स्थानापन्न होऊन नियुक्त झालेल्या ह्या बुवाने आपल्या दादाच्या मार्गदर्शनाखाली सरळ सरळ वसुलीभाईची भूमिका हाती घेतली आहे.

एवढं सगळं होत असतांनाच इतरही अनेक कारणे शोधून देऊळगावराजा येथे कार्यरत असलेल्या झारीतील शुक्राचार्याने मी त्यातील नव्हेच म्हणजे तो मी नव्हेच असे गृहीत धरले.

अन आपण रचलेला सापळा व्यवस्थित कार्य करतोय, हे सिंदखेडराजा तालुक्यातील वातावरणावरुन मानस मनात ठरवले. 

याचवेळी, त्यांची नियुक्ती वरिष्ठ पातळीवरून झाली आहे. त्यामुळे जेथे सगळं काही सुरळीत चालू आहे, त्यासाठी काहीही करणे न लगे अशी मानसिकता असलेल्या व त्यातून कुठलीही ठोस भूमिका घेतली नसलेल्या शिक्षकांनी मौन बाळगले. तर शिक्षक संघटनेचे कुंकू, साखरपुडा, पाहुणकी, मौत, सावडणे आदि प्रत्येक ठिकाणी स्वतःचे नाव आले नाही किंवा घेतले नाही असा वेळोवेळी इश्यू करणारे तथाकथित नेतेही का मौन बाळगून आहेत? या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

शैक्षणिक क्षेत्राविषयी अनास्था बाळगणारे सगळेच मौनाची भूमिका का घेत आहेत? हे सुध्दा कळत नाही.

एकंदरीत तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात दिवसाढवळ्या घुसखोरी होत असतांना तालुक्यात ज्यांना तज्ञ समजले जाते, त्यांनीही मौन बाळगावे? हे सुध्दा अनाकलनीय आहे. एवढे मात्र निश्चित ..!

टिप्पण्या

  1. पैसे खाऊ प्रकरणाला वाचा फोडणारे आम्हीच,अन beo ना प्रभार देणारे आपल्याच साहेबांचे कार्यकर्ते आहेत,आता वसुली होणारच ना

    उत्तर द्याहटवा
  2. शैक्षणिक क्षेत्रात राजकीय पक्षाने पूर्वीपासून आपल्या अस्तित्व निर्माण केलेले आहे यात बॅकग्राऊंड वाटप करण्यापासून ते वह्यावरती राजकीय पुढाऱ्यांचे फोटो छापून मुलांच्या मनावरती व्यक्तीवर निर्माण करण्यात यशस्वी झालेली दिसून येतात आपण करत असलेल्या कार्य क्षमता पूर्ण पाठिंबा आहे असेच आपण वास्तववादी लिखाण करून समाजाला जागृत करावे हीच अपेक्षा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा