मातृतीर्थात त्या वेडेपणाची झाली वर्षपूर्ती , ते वेडे म्हणजेच "बळीवंश"
शेतकऱ्यांची बाजू घेणे, हिताची, संघर्षाची भूमिका मांडणे म्हणजेच वेडेपणा ९ ऑगस्ट रोजी 'भारत छोडो' आंदोलनदिनी मातृतीर्थात त्या वेडेपणाची झाली वर्षपूर्ती ते वेडे म्हणजेच "बळीवंश" सिंदखेडराजा:- तालुक्यातील भौगोलिकता पाहता इथे विविध प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. मागील कालावधीत नैसर्गिक अन्न साखळी तुटल्याने व त्यामुळे वन्यप्राण्यांचे असंतुलन निर्माण झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांना पिक उत्पादनात होतो आहे. ही बाब लक्षात आली ती रुम्हणा येथील एक युवक जो बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहे व मातीशी जन्मजात नाते आहे त्याचा लक्षात ही बाब आली. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना नव्याने समोर आली व दृढही झाली आहे. त्यामुळे आपल्याला काम करुनही वेळ मिळतो, त्याचा लाभ आपण कुटूंब, गाव, परिसर नव्हेतर आपल्या मातृतीर्थातल्या सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना देऊ शकतो यावर त्याचे लक्ष केंद्रित झाले नव्हेतर त्याने जाणीवपूर्वक केंद्रित केले. यासाठी चळवळ निर्माण व्हावी म्हणून ९ ऑगस्ट, २०२३ रोजी बळीवंश असे नामकरण केले. सगळ्याच सदस्यांना पूर्ण वेळ देणे शक्य नसल्यामुळे...