संडे हो या मंडे तपासून खावे अंडे .. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नकली प्लास्टिक अंडे विक्रीचा फंडा जोमात

 संडे हो या मंडे तपासून खावे अंडे ..

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नकली प्लास्टिक अंडे विक्रीचा फंडा जोमात


सिंदखेडराजा:- तालुक्यातील खेड्यापाड्यात नकली प्लास्टिक अंडी विक्रीचे रॅकेट सुरु असल्याची खात्रीशीर प्राप्त झाली आहे. एका गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून प्रशासनाने ह्याकडे तातडीने लक्ष देत यावर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ह्या उक्तीनुसार  तालुकाभरात एरव्ही हिवाळ्यात अंडी खाण्यावर जोर असतो. मात्र गेल्यावर्षी पासून कोरोना संसर्ग प्रसार सुरु झाल्यानंतर मांसाहार व अंडी खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही खर्चाच्या व उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून अंडी सोयीची असल्याने, सर्वसामान्यांचा जोर अंड्यावर जास्त आहे. परंतु, गावातच कोंबडी पालन करणाऱ्यांकडे नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे, ग्राहकांना दुकानात उपलब्ध असलेली अंडी खरेदी करावी लागतात. बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करुन गावागावातील किराणा दुकानदार विक्रीसाठी अंडी ठेवत असतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंडी खाणे हे योग्य असल्याचा समज सर्वत्र असल्याने त्यांची मागणी सुद्धा वाढलेली आहे. याचाच गैरफायदा घेत नकली म्हणजेच प्लास्टिकची अंडी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. नकली अंडी विक्रीचा  प्रकार एक दोन दिवसांआधीच तालुक्यातील सिंदी येथे उघडकीस आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती घेतली असता, गावातील लहान दुकानदारांना ह्यासंदर्भात पारख व जाणीव नसल्याने अजाणतेपणी त्यांच्याकडून विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. 
त्यामुळे नकली प्लास्टिक अंडी विक्री गावागावात होण्याचा प्रकार उघड झाला आहे.
परंतु, त्या अंड्यांचा खाणाऱ्याच्या शरीरावर भविष्यात वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने ह्याबाबीकडे तातडीने लक्ष देऊन, नकली प्लास्टिक अंडी वितरक व निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.


राज्यातील प्रकारावर आळा घालावा ..

या प्रकारासंदर्भात सिंदी येथील माजी सरपंच तथा समाजसेवक गंभीरराव लक्ष्मणराव खरात यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये राज्यभरात हा प्रकार घडत असण्याची शक्यता व्यक्त करीत लहानसहान दुकानदारांऐवजी नकली प्लास्टिक अंड्यांची निर्मिती करणाऱ्यांची पाळेमुळे खोदून त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

अशी ओळखता येतात नकली प्लास्टिक अंडी ..

नकली अंड्यांचा रंग जास्त पांढरा असतो. त्याला हलविले असता त्यातून आवाज येतो. नकली अंडी पाण्यात बुडत नाहीत. ती अंडी फोडल्यावर पांढरा व पिवळा बलक सहजपणे एकमेकांत मिसळतात. नकली अंडी बॉईल करुन फोडल्यावर त्यांचा केमिकल सारखा वास येतो. नकली बॉईल अंडे फोडून एक दोन दिवस ठेवल्यावर ती प्लास्टिक सारखी कठीण होतात. यासंदर्भात अधिक व बारीकसारीक माहिती यु ट्यूबवर उपलब्ध आहे.

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूपच अवघड आहे, सर्वसामान्य माणसाने कुठे कुठे लक्ष द्यावे...
Unknown म्हणाले…
माणूसपण च हरवलं
Unknown म्हणाले…
आता काही ही नकली मिळत आहे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!