पोस्ट्स

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप! सरपंच नलिता गरड यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप! सरपंच नलिता गरड यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत अखेर राजकीय घडामोडींना उधाण येत सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार आज (दि. ३० मार्च, सोमवार) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुमताने हा ठराव पारित झाल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेल्या ठरावात सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांचा विश्वासात घेत नाहीत, उलट जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसली आहे,” असा आरोप सदस्यांनी केला. याशिवाय प्रशासनात समन्वयाचा अभाव, विकासकामांतील अनियमितता, सदस्यांशी सहकार्याचा अभाव आणि ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेचा अभाव ही कारणे ठरावात नमूद करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे, सरपंचांच्या पतीकडून कार्यालयीन कामात सतत हस्तक्षेप होत अस...

कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..! ५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण

इमेज
कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या 'जळताना भुई पायतळी' कवितासंग्रहाला जाहीर..! ५ एप्रिल रोजी दुसरबीड येथे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते व चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या उपस्थितीत होणार वितरण मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध दिवंगत कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार यावर्षी तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी दिली.  तान्हाजी बोऱ्हाडे हे इतिहास विषयात उच्चविद्याविभूषित असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील मोहे या गावी शासकीय आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच दुर्गम भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी बाबत ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. विष्णू जोशी यांच्या काव्याग्रह प्रकाशन, वाशिम द्वारा प्रकाशित जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहाचा सुलगती हे धरा पैरोतले हा हिंदी अनुवाद देखील प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ ग्रा...

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप; सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप;  सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, सरपंच व सचिवांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड आणि सचिव पी. जी. जाधव यांनी पूर्वीचे ग्रामसेवक जी. आर. गवई यांच्या संगनमताने विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, सदस्यांना विश्वासात न घेता व ग्रामसभेची मंजुरी न घेता थेट कामे दाखवून खोटे बिल सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसह इतर खात्यांमधील रक्कम काढून घेतल्याचे, तसेच प्रत्यक्षात काम न करता बिल पास करून निधीचा अपहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, अधिकृत अधिकार नसताना डीएससी (डिजिटल सिग्नेचर) चा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत....

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी

इमेज
  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांचा बंडाचा झेंडा; सरपंचांवर अविश्वासाचा निर्णायक डाव नऊ पैकी आठ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात थेट मोर्चेबांधणी सिंदखेडराजा (प्रतिनिधी)  तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नऊ पैकी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांविरोधात उघड बंड पुकारण्यात आले आहे. सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अविश्वास प्रस्ताव थेट तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे. या बंडामागे केवळ नाराजी नसून, ग्रामपंचायतीतील सत्ताबदलाचे स्पष्ट संकेत दिसत असल्याची चर्चा गावपातळीवर रंगली आहे. जवळपास सर्वच सदस्यांनी एकत्र येत सरपंचांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये “ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता नाही, सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, विकासकामे ठप्प झाली आहेत,” असे गंभीर आरोप केले आहेत. या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या सदस्यांमध्ये विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरुड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, म्हस्के मीनाक्षी विनोद आणि भा...

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

इमेज
चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा सिंदखेडराजा:- नजीकच्या चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणी माजी आमदार यांच्या भूमिकेला लक्ष करीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख असलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरळसरळ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात चिखला काकड, ता. लोणार येथील प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या जातीयवादी विखारी भूमिकेमुळे अस्वस्थ झाल्याचे राजीनामा पत्रात विदित करीत सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी राजीनामा मंजूर करुन आपला श्वास मोकळा करण्याचे राजीनामा पत्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले आहे. ह्या राजीनामा पत्रात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेचे संस्थापक माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रवाहित करण्याचे काम शिव...

मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या   सिंदखेडराजा:- तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील वयोवृद्ध शेतकरी बाबुराव श्रीराम देशमुख यांनी सततची नापिकी व मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज या चिंतेपोटी स्वतःच्या शेतातील उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यासंदर्भात मृतक शेतकऱ्याचा पुतण्या अमोल संजयराव देशमुख (वय ३०) यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार बाबुराव श्रीराम देशमुख वय ६१ वर्षे, हे आज दि. २९ डिसेंबर २०२५, सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील मोटर पंप चालू करण्यासाठी गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःच्याच शेतातील उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत काहींना दिसले, त्यावरुन मिळालेल्या मोबाईल कॉल व  संदेशानुसार मी शेतात जाऊन खात्री केली असता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. माझे काका बाबुराव श्रीराम देशमुख, रा. मलकापूर पांग्रा  यांच्या...

विहीर नोंदणीचा अथवा काढण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही पूर्वापार परंपरा व ऑनलाईन नोंदणीतील बदलामुळे होतोय घोळ? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज

इमेज
  "पाठलाग बातमीचा" विहीर नोंदणीचा अथवा काढण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही  पूर्वापार परंपरा व ऑनलाईन नोंदणीतील बदलामुळे होतोय घोळ? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज   सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी):- तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील प्रल्हाद बजेबा पंजरकर या शेतकऱ्याच्या विहीरीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंद प्रकरणाच्या "दीसना" मधील दि. २७ डिसेंबर, शनिवारी प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे तालुकाभरातील शेतकरी तसेच महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. वृत्त प्रकाशित होताच आणखी काही शेतकऱ्यांच्या विहिरीची नोंद सुद्धा गायब झाली असल्याची माहिती काहींनी संपर्क साधून सांगितल्याने समोर आली आहे.  त्यातून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता, शेतकरी वर्गाला बदलांची माहिती नाही. त्यामुळे गैरसमजातून हे प्रकार घडत असल्याचेही समोर आले आहे. आज दि. २८ डिसेंबर, रोजी रविवार असल्याने संबंधित खात्याच्या अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क साधावा की नाही? याबाबत "दीसना" परिवाराच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. त्यास्तव समाजमाध्यमांवरुन संबंधितांना संदेश दिला असता, सिंदखेडराजा तहसी...