यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न सिंदखेडराजा:- यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. ते मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व त्यामध्ये अपयशाने गर्भगळीत न होता, त्याकडे दुर्लक्ष करीत, अभ्यासात शेवटपर्यंत सातत्य ठेवावे लागते, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेतील गुणवंत गौरव गंगाधर कायंदे याने केले. देऊळगावराजा येथील योगीराज लॉन्स येथे दि. २५ जून, रविवारी संत श्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठान बुलढाणा-जालना यांच्यावतीने आयोजित 'प्रथम विदर्भ वंजारी समाजरत्न' सन्मान व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात गौरव कायंदे सत्काराला उत्तर देत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे, तर हभप सानप गुरुजी, प्रा.गंगाधर कायंदे, राजेंद्र वाघ, जालिंदर बुधवत, विनोद वाघ, सौ. नंदाताई कायंदे, सौ. शारदाताई जायभाये, आत्माराम कायंदे, भगवान मुंढे, देवानंद कायंदे, दादाराव खार्डे, गणेश मांटे, प्रकाश गीते, रमेश कायंदे, तोताराम नागरे, सावळाराम नागरे, बद्री बोडखे, डॉ. केशव आघाव, युवराज नागरे, वामनराव आघाव, अमोल काक...