पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"इगो" म्हणजेच "गं ची बाधा .." ती लयच वाईट! ती कुठलंच ठेवत नाही.

इमेज
 "इगो" म्हणजेच  "गं ची बाधा .."  ती लयच वाईट! ती कुठलंच ठेवत नाही. सिंदखेडराजा:- आपण सर्वजण ज्याला इगो म्हणतो, पूर्वी त्यालाच 'गं ची बाधा' असे म्हणायचे. जगण्याच्या व अनुभवाच्या दृष्टिकोनातून माझ्यासारखे अनेकजण अगदीच खालच्या पातळीतील सापडतील. सकाळच्या न्याहरीत खायला रातची भाकर, ठेचा, खार (लोणचे) कधीमधी कुटके, दुपारी ज्वारीची भाकर व जी उपलब्ध असेल ती भाजी. रात्रीच्या वेळी मात्र हमखास डाळ ठरलेली. सोबतच नेसायला काय तर कुटुंबातील वयपरत्वे मोठ्या व्यक्तीने नेसून टाकलेले, वापरुन जुने केलेले कपडे. आणि ते जरी आणखी जीर्ण झाले किंवा फाटले तर त्याला टीपा देऊन, किंवा घरच्या सुईदोऱ्याने शिवून वापरायचे. त्यानंतर कपडे नेसायची पुढची पातळी येत नाही, तोपर्यंत शाळेतल्या सोबतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रेमाने "लाईट लाईट" म्हणून संबोधावे, असा तो काळ .. पण, त्यावेळच्या गावगाड्यात नाकाडोळ्याची कुटुंबे सुध्दा ह्याच प्रकारचे जीवन जगत असत, त्यामुळे कुठेच उचनीचता आढळत नव्हती. त्याकाळी सुबत्ता नसली तरी प्रेम, आपुलकी, सौहार्दाने गावगाडे चालायचे.  मात्र त्यानंतर हळूहळू धडक...

"धीर" धरीत मतांचा जोगवा मागणारा हार्ड हिटर ठरणार ..?

इमेज
"धीर" धरीत मतांचा जोगवा मागणारा पदवीधर हार्ड हिटर ठरणार ..? सिंदखेडराजा:- मतदानासाठी आजचा दिवस बघितला अन गेल्या काही वर्षांपासून असणारे  असुरक्षेचे वातावरण माझ्या लक्षात आले. मतदान करुन बाहेर येत नाही तोच, चांगल्या पोस्टवर नोकरी करणारा एक माजी विद्यार्थी भेटला. त्याने सांगितले की, गावातीलच एका व्यक्तीजवळ त्याने नोंदणी फॉर्म भरून दिला होता. तरीही मतदान यादीत त्याचे व इतरांचे नाव नव्हते. पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेले असल्याने, वेळेवर काहीच पर्याय नसल्याने, दोघेही निराश झालो.  त्याचवेळी माझ्यासमोर काही वर्षांपूर्वीचा काळ झळकून गेला. माझ्या काळातील लोकं पदवीधर झाल्यावर खूप आशावादी असायचे. दारासमोरच्या पाटीवर स्वतःच्या नावाखाली डिग्री टाकायचे. पदवीधर मतदार संघात मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी खूप जण झटायचे. त्यातून मतदार यादी तयार व्हायची. कुठलेही अभिनिवेश न बाळगता आम्ही मतदानाला जायचो. आपापल्या उमेदवाराला मतदान करायचो. ह्यावेळी मात्र, मतदार नाव नोंदणी करतांना सगळ्यांना बोलवायचे. पण, फॉर्म भरून दिल्यावर ही व्यक्ती आपला मतदार होऊ शकतो की नाही? हे बघत ह्या व्यक्तीचे मतदान आपल्या उमे...

वाढदिवस असा असावा ..!

इमेज
 आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान रक्तदानातून वाढदिवस साजरा करणारे  डॉक्टर रामदास शिंदे साहेब.  मनःपूर्वक शुभेच्छा ....!🌷🎂🙏 देऊळगावराजा:- युवावस्थेत येत असतांनाच स्व. सुरेशभाऊ सोनुने ह्यांच्या वैचारिक दिशेने देऊळगावराजा व परिसरातील आम्हा युवकांची चळवळ उभी राहिली. त्यानंतर एमबीबीएस झालेला व आपल्या तालुक्याला लागून असलेल्या ताडशिवणी येथील एक रामदास नावाचा कुणीतरी डॉक्टर शहरात आलाय, इतकी माहिती मिळाली.  सर्व बाजूंनी सर्व्हेक्षण करणारी आमची टोळी होती. सिनेमात काय झालंय? रस्त्यावर काय घडतंय? चौकाचौकात काय होतंय? सगळ्या दिशेनं आम्ही कार्यरत होतो. सर्व्हेक्षण झाल्यावर आमची स्थानिक चौंडेश्वरी हॉटेलवर आम्हा सर्वांची मिटिंग व्हायची. त्यानंतर कुणाला साथ द्यायची, कुणासाठी ओळख न दाखवता निरपेक्ष राहायचे, ह्यासंदर्भात लीडर म्हणजे आम्हा सर्वांचे लाडके स्व. सुरेशभाऊ सोनुने हे आदेश द्यायचे. त्यानुसार आम्ही सकाळी कार्यरत व्हायचो. दुपारी पुन्हा दुसरे सर्व्हेक्षण हा नित्याचा कार्यक्रम असे.  एका दिवशी सकाळीच आपल्या गावात डॉ. रामदास शिंदे नावाची व्यक्ती आली, असा मेसेज मिळ...

सातासमुद्रापार .. आपल्या "राजूचा" झाला सत्कार ..

इमेज
  सातासमुद्रापार .. आ पल्या "राजूचा" झाला सत्कार .. मागील ७५ वर्षात ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा नुकताच ब्रिटनमध्ये सत्कार करण्यात आला. आपल्यासाठी या पुरस्कारामध्ये महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ह्या अगदी छोट्या गावातील शेतकरी पुत्र राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांस लंडनच्या ब्रिटिश कॉन्सिलतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.   ब्रिटिश कौन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नुकताच पार पडला. राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोट्याश्या खेड्यातील भटक्या असलेल्या वंजारी समाजातून येतात. राजू हा त्याच्या पिढीतील उच्च शिक्षण घेणारा व्यक्ती  आहे. राजूचे शालेय शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो पुण्यात गेला परंतु, आर्थिक आणि ...

धन्यवाद ..! डॉ. विशाल शितोळे.

इमेज
  धन्यवाद ..! डॉ. विशाल शितोळे. श्री. माणिकराव घुगे, वय ८८ वर्षे, सेवानिवृत्त अभियंता, चिखली, जि. बुलढाणा यांचा दि. ८ जानेवारी, रविवारी घरगुती अपघात होऊन, पाय फ्रॅक्चर झाला होता. अगोदर बायपास सर्जरी झालेली, उतरतं वय, अन त्यात पाय फ्रॅक्चर फेमेर हाड मोडलेले, आता यावर उपचार करण्यासाठी नेमके कोणत्या दवाखान्यात न्यावे? असा प्रश्न कुटुंबीय व नातेवाईकांना पडला. त्याचवेळी चिखली येथीलच शिवाजी उद्यानाकडून बुलढाणा मार्गावर असलेल्या शितोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल मधुकर शितोळे यांनी जबाबदारी घेण्याचे कबूल केले.  दि. १० जानेवारी, मंगळवारी शस्त्रक्रिया करीत रॉड टाकण्यात आले.  आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी आज दि. ११ जानेवारी, बुधवारी घुगे साहेबांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामही केला. दवाखान्यातून उद्या सुटी देखील होणार आहे. अगोदरच बायपास सर्जरी झालेल्या आणि त्यात उतरत्या वयाच्या रुग्णाला तीन ते चार दिवसांत आराम मिळतो. हे सगळं अनुभवल्यावर कुटुंबीय व नातेवाईक यांनी रुग्णाला जर मोठ्या शहरात नेले असते तर विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या (मेडिकल टेस्ट्स) करण्यातच वेळ गेला असता ...

भावी वैज्ञानिकांना बळ देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत - डॉ. बाळासाहेब गावंडे

इमेज
विद्यार्थ्यांतील भावी वैज्ञानिकांना बळ देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत - डॉ. बाळासाहेब गावंडे सिंदखेडराजा:- "विद्यार्थ्यांच्या आतल्या उर्जेतून आलेल्या वैज्ञानिक संकल्पना व त्यातून निर्माण होणाऱ्या भावी वैज्ञानिकाला बळ देण्याचे काम शिक्षकच करु शकतात" असे प्रतिपादन डॉ. निलेश उपाख्य बाळासाहेब गावंडे यांनी केले. आज दि. ६ जानेवारी, शुक्रवारला साखरखेर्डा येथे आयोजित सिंदखेडराजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणुन ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुमनताई सुनील जगताप तर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे, विज्ञान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक नागरे, केंद्रप्रमुख गणेश डिघोळे, दिलिप खंडारे, माधव देशमुख, नंदकिशोर शिंगणे, संतोष सोनुने, विलास कायंदे, दिलीप काकडे, विलास आघाव आदि  प्रमुख उपस्थितीत होते. पुढे बोलतांना गावंडे ह्यांनी महाविद्यालयात होणाऱ्या अंतर्गत उपक्रमांचे विश्लेषण केले. तर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे ह्यांनी एका बैठकीसाठी आलो असता, अचानक एक सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलो असतांना आपल्याला महाविद्यालयात असलेल्या विविध अभ्यासक्रमांच...