पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साखरखेर्डा येथे पुन्हा तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

इमेज
साखरखेर्डा येथे पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या, आता संख्या पोहोचली आठ वर .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथे काल दि. ३० जुलै, गुरुवारी पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आज दि. ३१ जुलै, शुक्रवारी पुन्हा तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. त्यातून साखरखेर्डा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण आठ झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी ही समस्या गंभीरपणे हाताळत, अंतर्मुख होऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.  साखरखेर्डा येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच्या परिस्थितीत ज्या गांभीर्याने कोरोना विषाणू प्रसाराची दखल घेतली होती. त्यात कुठेतरी हलगर्जीपणा आल्याचे आढळून येत आहे. यातूनच गावात तसेच कुटुंबांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती दुर्लक्षित होत गेल्या. ह्या हलगर्जीपणातूनच कोरोना विषाणू प्रसाराला वाव मिळाला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. काल दि. ३० जुलै, गुरुवारी बसस्थानक परिसरातील दोन तसेच गावाच्या अंतर्गत भागातील तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर आता विविध क्षेत्रातील व्यक्ती कामाशिवाय बाहेर पडणार नाहीत अशी अपेक्षा...

पांडुरंग सुरळकर गुरुजींचे निधन

इमेज
निधन वार्ता .. पांडुरंग सुरळकर गुरुजी सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील पांडुरंग बंडूजी सुरळकर, गुरुजी यांचे आज  दि. ३१ जुलै, शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. सुरळकर गुरुजी हे मोडी लिपीचे जाणकार होते. हिवरा आश्रम, ता. मेहकर येथील विवेकानंद आश्रमचे संस्थापक स्व. स्वामी शुकदास महाराज ह्यांना इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षणाचे धडे दिले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवे, पतवंडे असा बराच मोठा मित्र परिवार आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणीचा जुना जाणता शिक्षकाच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. आपण नोंद घेऊन, संबंधितांना कळवावे. भावपूर्ण श्रद्धांजली ...!           🌹🙏

गारखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

इमेज
गारखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  सिंदखेडराजाः- जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली तालुक्यातील गारखेड येथील एक व्यक्ती दि. २ जुलै, गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. दि. ३ जुलै, शुक्रवारी त्याच्या संपर्कातील १७ व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सदानंद बनसोड यांनी दिली आहे. यामध्ये गारखेड येथील तीन व्यक्ती तर वर्दडी येथील एक व्यक्ती असल्याचेही डॉ. सदानंद बनसोड यांनी सांगितले आहे. हे वृत्त येताच तालुक्यात खळबळ उडाली असून, विविध प्रकारच्या शंकात्मक चर्चांना पेव फुटले आहे.