तो मुख्याध्यापक निलंबित .. पुढेही कारवाई करण्याची विधवेची मागणी सिंदखेडराजा:- तालुक्यातील किनगावराजा पोलिस ठाण्यात अटक झालेल्या भानगडीबाज तथाकथित केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक बुरकुल याला निलंबित करण्यात आले असल्याचे वृत्त हाती आले आहे. याचवेळी तो बडतर्फ व्हावा अशी मागणीही सामाजिक शैक्षणिक, कृषी, व्यावसायिक आदि बऱ्याच क्षेत्रातून व्यक्त होत आहे. देऊळगावराजा तालुक्यात देऊळगावमही येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्याकपदी कार्यरत असलेला दामोदर माणिकराव बुरकुल या आरोपीने दुसरबीड येथील पतसंस्थेत खोटी माहिती देऊन बनावट कागदपत्रे सादर केली. त्या माध्यमातून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड झाली नाही. म्हणून पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी त्यासंदर्भात किनगावराजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत तथ्य समोर आले. म्हणून आरोपी दामोदर माणिकराव बुरकुल यास काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याची माहिती देऊळगावराजा येथील शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने दामोदर माणिकराव बुरकुल यास कारणे बजाव नोटीस देण्यात आली होती. याचवेळी वरिष्ठ अधिक...