पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमदार उदंड जाहलेत ..! लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोजराव ....!!

इमेज
 आमदार उदंड जाहलेत ..! लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोजराव ....!! सिंदखेडराजा:- आ. श्रीमान मनोजराव, सर्वप्रथम आपल्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा ..! आम्हाला इतिहास बदलवायचा आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन आपण आगेकूच करीत आहात. त्याबद्दल कदापिही संशय नाही. परंतु, सगळ्यांना सोबत घेऊन चालतांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर आपले निरीक्षण नक्कीच होत असते, हे आपण किंवा आपली सहकारी मंडळी यांनी विसरता कामा नये. यापूर्वीही आमदार म्हणून डॉ. शिंगणे, डॉ. खेडेकर, आपले आजोबा तोतारामजी कायंदे, स्व. भास्कररावजी शिंगणे, स्व. जे. के. खरात या सगळ्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आपले पिताश्री स्व. देवानंद भाऊ कायंदे यांनी ती क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःला अनेक कसोट्यांवर झोकून दिले होते.  त्याचाच परिपाक म्हणून अनेक राजकीय समीकरणे पाहत मतविभाजन होत आपणांस लोकांनी निवडून दिलेले आहे. आपण केवळ एका जातीचे आमदार नाहीत आणि नसू  ही नव्हे तर समाज ही परिभाषा समजून घेत आपण समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा ह्या अपेक्षेप्रमाणे आपण तेवढं प्रत्यक्ष रुपात करताही, त्याबद्दल आपले नक्कीच अभिनंदन ..! या...

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा

इमेज
  शिंगणे, कायंदे परिवार .. अन  मी दीसना  खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा  (दीपक सत्यभान नागरे) सिंदखेडराजा:- नवनिर्वाचित आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांच्या वर्तनाचा पत्रकार म्हणून निरीक्षण व अभ्यास करीत, त्यातून जे काही आकलन झाले, त्यासंदर्भात मी एक वृत्त प्रकाशित केले. त्यातून काही जळकुट्यांची 'चांगलीच ठणकली' म्हणा किंवा खास गावरान भाषेत 'चांगलीच खकानली' त्यातील ज्यांची पार्श्वभूमी स्वार्थातून पलटूराम अशी राहिलेली आहे. अशांनी कुठलाही प्रकारचा राजकीय, सामाजिक आदि इतिहास माहीत नसतांना, फक्त कुठलातरी राजकीय लाभ मिळावा व आपण केवढे पायचाटू आहोत? हे प्रकाशात यावे, ह्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करीत, थयथयाट करणे हाती घेतले आहे. त्याला हे उत्तर मी देत आहे. माझी वैचारिक भूमिका ही सदैव शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीला आधारित आहे. त्यातूनच स्व. सुरेशभाऊ सोनुने यांनी माझे शिक्षक असलेले वडील स्व. सत्यभान बाळाजी नागरे यांना विचारले व मला संघटनात्मक कार्यासाठी मी १९८१ पासून कॉग्रेसच्या राजकारणात आणले. तेव्हापासून मी एन‌एस‌युआय या विद्यार्थी चळवळी...