आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷 माझा साळुबा मामा ..!🙏
आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷 माझा साळुबा मामा ..!🙏 सावखेड तेजन, ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व आम्हा सर्व भाच्यांचे लाडके मामा श्री. साळुबा नामदेवराव जायभाये यांचे चारवर्षांपूर्वी वृद्धापकाळाने आजच्या रोजी म्हणजे दि. २४ जानेवारी, २०२० शुक्रवारी सकाळी ५.३० वा. जालना हॉस्पिटल, जालना येथे निधन झाले. मृत्युसमयी ते वय ८५ वर्ष्यांचे होते. किनगावराजा येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शिवानंद जायभाये ह्यांचे वडील असलेले साळुबा मामा हे प्रेमळ ह्या व्याख्येच्या पलीकडे जाणारे व्यक्तिमत्त्व. त्यांची आठवण झाली की, वेगळीच ऊर्जा आम्हा भाच्यांच्या मनात निर्माण होते. आम्हा सगळ्या भाच्यांची खूप काही काळजी त्यांनी घेतली. माय ह्या शब्दात एकदाच 'मा' येतो. पण दोनदा मा येणारे जायभाये वाड्यातील आमचे बाजीराव मामा, किसन मामा, राम मामा, उत्तम मामा, कारभारी मामा, आश्रूबा मामा, लक्ष्मण मामा, भीमराव मामा आदि प्रत्येक मामा आमच्या नशिबी होते. नव्हेतर त्यांनी आमच्या व्यक्तिमत्वाला वळण लावले. म्हणूनच आम्ही घडलो. आमच्या साळुबा मामांच्या प्रेमळ स्मृती आजही उरात जिवंत आहे. इथ...