पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के सहा पैकी चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के ..

इमेज
  साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के सहा पैकी चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के .. साखरखेर्डा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के एवढा लागला असून, एकूण सहा पैकी चार माध्यमिक विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे. जिजामाता विद्यालयाचे एकूण १५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. या १५३ पैकी ९२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर अवघे १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्री शिवाजी हायस्कूलचे १३६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. अनिकेत इंग्लिश स्कुलचे २७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. सहकार विद्या मंदिरचे ५१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. एस. इ. एस. हायस्कुलचे १२८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन त्यापैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण ...

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

इमेज
  तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील एक तरुण पोहतांना पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा करुण अंत झाला आहे. साखरखेर्डा येथील शेख हरुन शेख गुलाब, वय ३३ वर्षे हा युवक काल दि. ५ जून, रविवारी दुपारी स्थानिक महालक्ष्मी तलावात पोहायला गेला होता. पोहण्या दरम्यान पाण्यात तो बुडाला होता. ही माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार जितेंद्र अडोळे, बीट जमादार रामदास वैराळ, लक्ष्मण इनामे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पट्टीच्या पोहणारांनी शर्थीचे प्रयत्न करुनही काल सायंकाळी उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. आज दि. ६ जून, सोमवारी अगदी सकाळीच त्याचा मृतदेह पाण्याच्या वर आला. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार करुन शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे. पोहतांना दम छाटल्यामुळे मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे. ह्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून, पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.