काळीज कोंडीतून अनेक सामाजिक कोंडींची मुक्ती होवो .. प्रवीण, लेखन क्षेत्रात तुझा ठसा उमटणार ..
काळीज कोंडीतून अनेक सामाजिक कोंडींची मुक्ती होवो .. प्रवीण, लेखन क्षेत्रात तुझा ठसा उमटणार .. दीसना✍️ असं म्हणतात की, एक परिच्छेद लिहिण्यासाठी भरपूर अनुभव, अनेक पुस्तकं वाचलेली असावी लागतात. त्यातल्या त्यात लिहिणे हा प्रांत पूर्वी तथाकथित नोंद असलेल्या बुद्धिवाद्यांचा होता. मात्र आपल्या मातीतील अनेकांच्या वाचनाच्या तसेच अनुभवांच्या कक्षा विस्तीर्ण असल्या तरी लेखन प्रांताकडे त्यांचे दुर्लक्षच असल्याचे आढळून येते. विविध मुद्द्यांवर समाज प्रबोधन करण्यासाठी भोवताली अनेक विषय असतांनाही आम्ही त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. सध्या समाजमाध्यमातून शेंडा बुडूख नसलेल्या कुठलाही संदर्भ नसलेल्या गोष्टी माथी मारल्या जात आहेत. सध्याची शिक्षित असलेली युवापिढी वेगळ्या दिशेला नेत, तथाकथित ज्ञान परंतु वास्तवात घोर अज्ञानाच्या गर्तेकडे नेल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र ढळढळीत समोर उभे असल्याची परिस्थिती आहे. याचवेळी माझा भाऊ प्रवीण गीते समाज प्रबोधनाचे शिवधनुष्य उचलतो नव्हेतर लीलया पेलतोय, असा आशेचा किरण त्याच्या आतापर्यंतच्या लेखातून ठसठशीतपणे उमटून आलाय. प्रवीणचे वाचन व व्...