पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंदखेडराजा तालुक्यात वीजेचा लपंडाव साखरखेर्ड्यात कळस वीज ग्राहक वैतागले समस्या निवारणार कोण?

इमेज
  सिंदखेडराजा तालुक्यात वीजेचा लपंडाव  साखरखेर्ड्यात कळस वीज ग्राहक वैतागले समस्या निवारणार कोण? दीसना✍️ सिंदखेडराजा:- तालुक्यात वीजेचा लपंडाव तसेच कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याने कळस गाठला असून, संबंधित यंत्रणा गेंड्याची कातडी ओढून चुप्पी साधून आहे. याबाबतीत कुणीही लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याने जनतेचा भ्रमनिरास होत आहे. तालुका व वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात चार केंद्रांच्या माध्यमातून १२० गावांचा कारभार हाकलल्या जातो. त्यासाठी उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंते व कंपनीचे तसेच खाजगी वायरमन असा भलामोठा लवाजमा कार्यरत आहे. यंत्रणेचा एवढा मोठा डोलारा असूनही, जनतेच्या सोयीसुविधेची काळजी केल्या जात नसून, मनमानी कारभारामुळे "बडा घर पोकळ वासा अन वारा जाई भसाभसा" ह्या उक्तीप्रमाणे सर्वकाही सुरु आहे. वीज पुरवठा करणाऱ्या सामुग्रीतील अनेक ठिकाणची सामुग्री ही जुनाटच असल्याचे दिसून येते. काही अपवाद वगळता वर्षोगणती सामुग्रीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यातुनच कागदोपत्री तर देखभाल दुरुस्ती केल्या जाऊन नुसती देयके तर काढली गेली नाहीत ना? असाही प...

गुढीपाडवा असला तरी आज आत्मचिंतन दिवस आम्ही चाललो कुठे?

इमेज
 गुढीपाडवा असला तरी आज आत्मचिंतन दिवस आम्ही चाललो कुठे? इशारा .. दीसना. ✍️ पारंपरिक दृष्ट्या आज गुढीपाडवा म्हणजे सणाचा दिन.  पण आजि आनंदाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू असं कधीच वाटलं नाही. कारण सण म्हणजे गोडधोड खाद्य पदार्थ, ही आमची परंपरा असली तरीही आज तिखट का खातात? ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही बालपणापासून शोधत होतो. त्याचं म्हणावं तसं समाधानकारक उत्तर कधीच मिळालं नाही. त्यानंतर शिक्षण घेऊन मोठे होत असतांनाच अशाच सणाच्या एके दिवशी हिंदवी स्वराज्याचे (हिंदू नव्हे) जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र व धाकले धनी संभाजी राजे यांचा मृत्यू अन गुढीपाडवा ह्याचा संदर्भ सोशल मीडियावरुन कळला. मात्र त्यावेळी पारंपरिक मानसिकतेतून हे खोटे असू शकते, असे वाटले. त्याच दरम्यान माझे लहान बंधू व वैचारिक साम्य असलेल्या काहींच्या माध्यमातून एका कार्यक्रमाला उपस्थित राहता आले. तेथे आपल्यात आणि तथाकथित समाज धुरंधरांच्या शैक्षणिक बाबीत हजारो वर्षांचा बॅकलॉग असल्याचे स्पष्ट झाले. तर त्याचवेळी अनेक बाबींचा खुलासा वक्त्यांनी केला. माझ्या पदवी नंतर मी एमपीएससीची तयारी केली होती. त्यात मुख्य परीक्षेला माझ...